Take a fresh look at your lifestyle.

Online Matrimony : ऑनलाईन मॅरेज-ब्युरो रेफर करताय? ‘ही’ काळजी नक्की घ्या नाहीतर…

0

Online Matrimony सध्या सगळं काही बिझी-बिझी झालंय. लग्न, शोधावायचे स्थळ आणि त्यासाठी वेळ काढणे अवघड होऊन बसलंय. त्यामुळे बहुतांशी लोक ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजशी जोडलेले दिसत आहेत. खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी, भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः लाखोंच्या संख्येने लोक जोडलेले आहेत. त्यांना रिस्पॉन्सही छान मिळतो. मात्र या साईटसचा वापर करताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात…

Online Matrimony काय कराल?

1) संकेतस्थळ सुरक्षित असले तरी त्याचा वापर सांभाळून करा आणि सुरुवातीला वेगळ्या ई-मेलद्वारेच संपर्कात रहा.

2) सामान्यपणे विक्षिप्त वाटेल अशी व्यक्ती शोधा. गंभीर माणसे वेळ आणि मुख्य म्हणजे स्वतःसाठीचा वेळ याचा आदर करतात.

3) आपल्या प्रोफाईल्सना आलेले रिस्पॉन्स मित्रपरिवाराला दाखवत चला. कोणताही पूर्वग्रह नसलेली चांगली मते ते देऊ शकतात.

4) फोनवर संभाषण करणे केव्हाही चांगले. संवाद कौशल्य आणि समाजात रूळण्याचे कौशल्य यावरून लक्षात येऊ शकते.

5) फोनसाठी प्री-पेड मोबाईलचा वापर करा. थोडक्यात कॉलर आयडीवर तुमचा नंबर दिसणार नाही, याची दक्षता घ्या.

6) प्राथमिक पातळीवर सगळ्या गोष्टी पसंत पडून, तुम्ही भेटण्याचा निर्णय घेतला तरी आपले मत आपण कधीही बदलू शकतो, हे लक्षात असू द्या.

7) जेथे अनेक लोक असतील अशी सुरक्षित जागा, सार्वजनिक ठिकाण हेच तुमचे भेटण्याचे ठिकाण असू द्या. चित्रपटगृह हे भेटण्याचे ठिकाण असू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या : कार लोनसाठी अर्ज करताय? मग त्यावेळी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

8) जे पैशांची मागणी करतात, त्यांच्यापासून सावध होऊन वेळीच संपर्क संपवा.

Online Matrimony काय टाळाल?

1) आपले नाव, पत्ता, फोन नंबर्स, कामाचे ठिकाण किंवा आणखी काही महत्त्वाची आणि व्यक्तिगत माहिती लगेच उघड करू नका.

2) रोजच्या वापरातला किंवा ऑफिसचा ई-मेल आयडी तसेच इतर माहिती देण्याची घाई नको.

3) नेहमीच्या ई-मेल आयडीतील आपले नाव, फोन नं. आदी माहिती असते. या गोष्टी ऑनलाईन मॅट्रिमोनीत असू नयेत.

4) ऑनलाईन माध्यमातून जरी भेटत असाल तरी कोणाच्याही फार जवळ लगेच जाऊ नका.

5) खोटारडेपणा, माहितीत सातत्य नसणे तसेच ऑनलाईनवरील त्यांच्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षातले त्यांचे वेगळे वागणे, या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

6) मित्र, नातेवाईक, सहकारी, घरच्या माणसांशी ओळख करून देण्यास जर ते उदासीन असतील, तर त्याकडेही दुर्लक्ष होता कामा नये.

7) तुमची भेट ठरली असेल तर त्यांना घरी घ्यायला आणि सोडायला बोलावू नका.

हेही वाचा : जाणून घ्या! चलनी नोटांवर गांधीजींचाच फोटो का असतो?

8) भेटीत रागीट स्वभाव, वर्चस्व गाजवणारी किवा समोरच्याबद्दल अपमान दर्शवणारी वर्तणूक टाळा.

9) विवाह संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर प्रोफाईल्स बरी वाटली म्हणून ताबडतोब त्याचे ग्राहक होण्याचा मोह टाळा.

10) या संकेतस्थळांची जी मोफत सेवा असते तिचा फायदा करून घेऊन आपल्या कल्पनेतील राजकुमार/राजकुमारी भेटते का ते पाहा.

11) तुमचे प्रोफाईल हे कायम अप-टू-डेट ठेवा. मुख्य म्हणजे त्यात तुमच्याशी संपर्क करण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी असू नयेत.

12) माहितीसोबतच या साईट्सवर आपले फोटोही टाकावे लागतात. हे फोटो कटाक्षाने सोबर असतील असे पाहा.

13) तुमच्या प्रोफाईलमध्ये असलेली माहिती ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची निदर्शक असावी. उगाच भारंभार गुणवर्णन त्यात असू नये.

14) आपल्याला कसा जोडीदार हवा, याचा पुरेपूर उलगडा आपल्या प्रोफाईलमधून व्हायला हवा. म्हणजे, अपेक्षा नीट न समजल्याने आलेले रिस्पॉन्सेस तुम्ही टाळू शकाल.

15) एखादी व्यक्ति तुम्हाला चांगली, तुमच्या अपेक्षांमध्ये बसणारी वाटली तर समोरुन रिस्पॉन्स येईल म्हणून थांबू नका. तुम्हीच पुढाकार घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues