Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Car Loan Documents : कार लोनसाठी अर्ज करताय? मग त्यावेळी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

0

Car Loan Documents प्रत्येकाला आपल्या जीवनात स्वत:ची कार घेण्याची इच्छा हि असतेच. मग ती कार स्वतःच्या वापरासाठी असते तर काही लोक व्यवसाय करण्यासाठी वाहनं खरेदी करतात. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी घेतल्या जाणाऱ्या वाहनांना पॅसेंजर व्हेईकल्स (Passenger Vehicle) असे म्हटलं जातं.

Car Loan Documents नव्या वर्षात किंवा या डिसेंबरमध्ये जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर अनेक सरकारी बँकांनी तुमच्यासाठी खास ऑफर आणल्या आहेत. कार लोन घेण्यासाठी तुम्ही बँकांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. पण लोनची प्रक्रिया करण्याआधी कोणती कागदपत्र लागतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. यातलं एकजरी कागदपत्र द्यायचं राहिलं तरी तुमची लोनची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे आताच या कागदपत्रांची जुळवाजुळव करायला घ्या.

Car Loan Documents लोनसाठी अर्ज करतांना तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते?

▪️ दोन पासपोर्ट साइज फोटो

▪️ ओळखीचा पुरावा – निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक ओरिजनल आणि ट्रू कॉपी दोन्ही

▪️ रहिवासी पुरावा – वीज बिल, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, वर्तमान नियोक्त्याने जारी केलेले फोटो ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतंही एक ओरिजनल आणि ट्रू कॉपी दोन्ही

हेही वाचा : ‘या’ 5 बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा!

Car Loan Documents नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी कोणती कागदपत्र लागतात

▪️ मागील ३ महिन्यांच्या वेतन स्लिपची मूळ/प्रमाणित प्रत

▪️ प्राप्तिकर विभागाची रीतसर पोचपावती असलेल्या मागील २ वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याची प्रत / प्राप्तिकर मूल्यांकन आदेश किंवा नियोक्त्याकडून जारी झालेला मागील २ वर्षांसाठी फॉर्म १६.

▪️ जिथे शक्य असेल तिथे नियोक्त्याकडून महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाठवण्याची हमी

▪️ इतर बँकेमध्ये पगार जमा होत असल्यास त्या खात्याचे मागील ६ महिन्यांचे स्टेटमेंट

(टीप – प्रत्येक बँकांच्या नियमानुसार वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता लागू शकते)

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews