Suicide Prevention Day : भारतामध्ये आत्महत्यांचे सर्वांत जास्त प्रमाण; वाचा सविस्तर आत्महत्येचे कारण आणि प्रमाण..
Suicide Prevention Day : जगभरात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे. या गंभीर समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दर वर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’(Suicide Prevention Day) साजरा केला जातो. यानिमित्ताने ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस’ (आयआयपीएस) या संस्थेने केलेल्या अभ्यासात तरुण पुरुषांच्या आत्महत्येत वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. १८ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण १३७ टक्क्यांनी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस संस्थेने अमेरिकेतील आघाडीच्या विद्यापीठांतील लेखकांच्या सहकार्याने हा अभ्यास केला. यात विद्यार्थी, पदवीधर आणि नवविवाहित जोडप्यांचा समावेश करण्यात आला. हा अभ्यास भारतातील आत्महत्येमुळे (Suicide) होणाऱ्या मृत्यूच्या बदलत्या पद्धतींवर करण्यात आला आहे. लॅन्सेट जनरलमध्ये नुकताच हा अभ्यास प्रकाशित झाला.
Table of Contents
आत्महत्या (Suicide) करण्याचे प्रमुख कारणे
सुसाइड किंवा आत्महत्या (Suicide) हा स्वतःचा जीव घेण्याचा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. बहुतांश लोकांच्या आत्महत्येसाठी अनेक प्रकारच्या मेंटल डिसऑर्डर जसे, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, स्क्रिजोफ्रेनिया, पर्सनालिटी डिसऑर्डर, एंग्जाइटी डिसऑर्डर आदी जबाबदार असतात. त्याशिवाय अनेक लोक जास्त दारु पिणे किंवा नशेच्या अधीन असल्या कारणानेही आत्महत्या करतात.
काही आत्महत्या प्रकरणांमागे माणसाच्या अनियंत्रित भावना जबाबदार असतात. अनेक वेळा तणाव, आर्थिक समस्या, नातेसंबंधातील समस्या जसे ब्रेकअप किंवा छळाला कंटाळून लोक आत्महत्येसारखी पावले उचलतात. सुसाइडचा सर्वात जास्त धोका त्या लोकांना असतो, ज्यांनी पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो.

आत्महत्या (Suicide)
करण्याचे प्रमुख कारणे
आत्महत्या (Suicide) रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आत्महत्येचे साधने जसे, शस्त्रे, औषधे आणि विष यासारखी साधने त्या माणसापासून दूर ठेवणे. या व्यतिरिक्त, मानसिक विकारांमुळे आणि काही प्रमाणात मानसिक छळामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आत्महत्या करण्याच्या भावना देखील भडकू शकतात.
हेही वाचा👉 : Thyroid Treatment : थायरॉईडचे प्रकार आणि तो पूर्णपणे बरा होण्यासाठी काय उपाय आहेत?
भारतात सर्वांत जास्त आत्महत्या (Suicide)
जगभरात दरवर्षी 8 लाख लोक आत्महत्या (Suicide) करतात. यापैकी 135,000 लोक भारतात राहतात. भारतात 1987 ते 2007 दरम्यान आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूर्वी हा दर 7.9 प्रति 1 लाख होता, आता तो 10.3 प्रति 1 लाख आहे.
वर्ष 2016 च्या आकडेवारीनुसार, भारतात आत्महत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. एका वर्षात आत्महत्येचे प्रमाण वाढून 2,30,314 झाले आहे. याव्यतिरिक्त, आत्महत्या हे भारतात 15 ते 29 वर्षे आणि 15 ते 39 वर्षे वयोगटातील मृत्यूचे सर्वात सामान्य कारण असल्याचे आढळून आले आहे.
On this World Suicide Prevention Day, I encourage you to "Stay, your story is not over." Wear teal and purple to show you care. Get this empowering shirt: https://t.co/h0sJdmutLQ #SuicidePrevention #KeepFighting #YourLifeMatters #CreatingHopeThroughAction #WSPD23 #WSPD pic.twitter.com/IIUBtPmlWf
— World Suicide Prevention Day (@wspdglobal) September 10, 2023
भारतातील बहुतेक आत्महत्या (Suicide) दक्षिण आणि पूर्व राज्यांमध्ये होतात. 2012 मध्ये तामिळनाडूमध्ये भारतात सर्वाधिक 12.5 टक्के आत्महत्या झाल्या. त्यानंतर अनुक्रमे महाराष्ट्र (11.9%) आणि पश्चिम बंगाल (11.0%) आहे. याशिवाय आत्महत्येच्या घटनांमध्ये केरळही मागे नाही. आत्महत्या प्रकरणांमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रमाण 2: 1 आहे.
त्याच वेळी, डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, भारतात महिला आणि पुरुषांच्या आत्महत्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतात 1 लाख महिलांमागे 16.4 महिला आत्महत्या करत आहेत. तर 1 लाख पैकी 25.8 पुरुष आत्महत्या करतात.
आत्महत्यांचे(Suicide) वाढते प्रमाण
२०१४ मध्ये पुरुष कामगार वर्गामध्ये १३,९४४ आत्महत्येची (Suicide) प्रकरणे होती, जी २०२१ मध्ये वाढून ३७,७५१ झाली. हीच परिस्थिती १८ ते २९ वयोगटातील पुरुषांमध्येही दिसून आली आहे. सन २०१४ मध्ये या वर्गातील २७,३४३ पुरुषांनी आत्महत्या केल्या होत्या, जी संख्या २०२१ मध्ये ३७,९४१ पर्यंत वाढले. याशिवाय २०१४ मध्ये ३० ते ४५ वयोगटातील ३०,६५९ पुरुषांनी आत्महत्या (Suicide) केल्या होत्या, ज्या २०२१ मध्ये वाढून ४०,४१५ झाल्या.