Take a fresh look at your lifestyle.

पत्रकार बनला डिजिटल शेतकरी, डोळे ऍग्रो फार्मची यशस्वी कहाणी

0

प्रयोगशील शेती यशस्वी होऊ शकते, अशी काही उदाहरणे आता खेडेगावात समोर येऊ लागली आहेत. योग्य पध्दतीने रिसर्च करून शेतीला सुगीचे दिवस आणण्याचे काम तरुण शेतकरी करत आहेत. जामखेड तालुका हा तसा सातत्याने दुष्काळ असलेला भाग. या भागात डोळेवाडी गावातील एका युवकाने उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचे काम केले आहे. विजय डोळे या युवकाने बंधू संजय व आई वडिलांच्या मतदीने डोळे ऍग्रो फार्म उभा करत शेतीला डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेले आहे.

लॉकडाउनच्या काळात मुंबईत एका प्रसिद्ध दैनिकातील मोठ्या पदावरील नोकरी सोडून या युवकाने गाव गाठले. सुरुवातील त्याने शेती करायचा निर्णय घेतला परंतु कुटुंबातील सदस्यांनी या गोष्टीला नकार देत पुन्हा शहराकडे जाण्याचा सल्ला दिला. कारण परिस्थिती तशी होती, जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळग्रस्थ भागात मोडत असल्याने पाण्याचा अभाव कायम सतावत असतो. त्यात आधुनिक शेतीचा प्रयोग आसपासच्या परिसरात कोणी केला नव्हता. मात्र विजय त्याच्या निर्णयावर ठाम होता. घरच्या 14 एकर शेतीपैकी अडीच एकर शेतीत प्रयोग करण्याचा निर्णय त्याने घेतला. बंधू संजय याच्या मदतीने सुरुवातील अर्धा एकरमध्ये कागदी लिंबू, एक एकरमध्ये शेवगा व तरकारी तर एक एकर तैवान पेरूची लागवड केली.

फक्त लागवड करूनच तो थांबला नाही तर पिकांवर कोणत्याही रसायनाचा वापर न करण्याचा त्याने निर्णय घेतला. शेण, गोमूत्र, जीवामृत स्लरी, दशपर्णी अर्क, नैसर्गिक साधनांने तसेच काही सेंद्रिय उत्पन्नाचा वापर करून शेती करण्याची गरज लक्षात घेऊन काम केले. सुरुवातीला अनेकांनी त्याला वेड्यात काढले मात्र त्याने स्वतः कष्ट करून अवघ्या सहा महिन्यात हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली व त्यांनीही विजयची प्रेरणा घेत त्यांनीही तारकारीमध्ये व फळबागेमधे प्रयोग करण्याची हिंमत दाखवली. दरम्यानच्या काळात त्याने कलिंगडाचीही लागवड केली मात्र व्यापाऱ्याकडून योग्य दर मिळत नसल्याने त्याने सोशल मीडियाचा वापर करून घरोघरी जाऊन कलिंगड विकून दाखवले. या प्रयोगानंतर त्याने जामखेडच्या ज्वारीलाही ग्लोबल लेव्हलवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मीडियातील आपल्या मित्रांच्या सहाय्याने जामखेडच्या ज्वारीचे वैशिष्ठे जगासमोर मांडली व स्वतःही डिजिटल मीडियाचा वापर करून प्रथमच ज्वारी ऑनलाईन विक्रीस मांडली गेली. या प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

विजय सध्या त्याचा व्यवसाय सांभाळत अद्यापही आपल्या शेतीत निरनिराळे प्रयोग करत असून यात त्याला त्याचा भाऊ संजय, आई-वडील यांचे सोबत तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब, पाटील साहेब, अडसूळ साहेब, माळशिकारे साहेब, ढवळे साहेबांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. भविष्यात शेतकऱ्यांना संघटीत करून उत्पादित होणाऱ्या मालावर प्रक्रिया करून रोजगारनिर्मिती करण्याचा विजयचा मानस आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues