Take a fresh look at your lifestyle.

EPFO Balance Check : पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली, या पद्धतीने उमंग अ‍ॅपवरून झटपट करा चेक

0

EPFO Balance : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे खातेदार त्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम घरी बसून तपासू शकतात. यासाठी तुम्हाला उमंग अॅपची गरज आहे.

पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा. हे अॅप पीएम मोदींनी 2017 मध्ये लॉन्च केले होते. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर स्वतःची नोंदणी करा. यानंतर EPFO ​​सर्व्हिसेसवर क्लिक करा. येथे तुम्हाला सेवा आणि विभाग असे दोन पर्याय मिळतील. यामध्ये सर्व्हिस ऑप्शन निवडा आणि व्ह्यू पासबुकवर जा. यानंतर तुम्हाला कर्मचारी-केंद्रित सेवेचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये UAN नंबर टाकावा लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर ओके बटणावर क्लिक करा. यानंतर, काही मिनिटांत तुम्हाला ईपीएफ बॅलन्सबद्दल माहिती मिळेल.

Namo Shetkari Yojana | ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार, वाचा सविस्तर माहिती

परंतु, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पीएफ (PF) खात्यातील रक्कम तपासायला हवी. कर्मचारी अनेक प्रकारे ही रक्कम तपासू शकते. जर तुम्हाला ही रक्कम तपासायची असेल तर तुम्ही ऑनलाइन देखील तपासू शकतात. याशिवाय जर ऑफलाइन (Offline) पद्धतीने एसएमएसद्वारेही शिल्लक तपासता येते.

01. ऑनलाइन शिल्लक (EPFO Balance)कशी तपासायची?

▸ कर्मचारी EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटद्वारे म्हणजे अधिकृत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे देखील शिल्लक तपासू शकतो.

▸ याशिवाय उमंग अॅपद्वारेही तो शिल्लक तपासू शकतो.

▸ शिल्लक तपासण्यासाठी कर्मचाऱ्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAAN) असणे आवश्यक आहे.

▸ यासोबतच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणेही आवश्यक आहे.

EPFO Balance 01

02. शिल्लक (EPFO Balance) कसे तपासायचे?

▸ प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा.

▸ यानंतर तुम्हाला उमंग अॅपवर लॉग इन करावे लागेल.

▸ तुम्ही मोबाईल नंबर, माझी ओळख, डिजीलॉकर वापरून लॉगिन करू शकता.

▸ नोंदणीनंतर उमंग अॅपच्या सर्चवर ‘सर्व्हिसेस’ लिहून सर्च करावे लागेल.

▸ आता तुमच्याकडे ईपीएफओचा सर्व्हिस शो असेल. आता सर्व्हिस पर्याय निवडा.

▸ येथे तुम्हाला तुमचा पीएफ खाते शिल्लक तपासण्यासाठी पासबुकवर क्लिक करावे लागेल.

▸ पासबुकवर, तुम्हाला एम्प्लॉयी सेन्ट्रिक सर्व्हिस आणि जनरल सर्व्हिसमधून एम्प्लॉयर सेन्ट्रिक सर्व्हिस निवडावी लागेल.

▸ आता तुमचा UAN नंबर टाका.

▸ यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

▸ आता OTP टाका आणि OK वर क्लिक करा.

▸ यानंतर तुमचे ईपीएफ खाते उघडले जाईल आणि तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता.

EPFO Check 02

मिस्ड कॉलद्वारे बॅलेन्स चेक करता येईल

यूएएन पोर्टलवर रजिस्टर मेंबर्सना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील बॅलेन्स तपासता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत.

वेबसाइटवर तपासा बॅलेन्स

Epfindia.gov.in या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर क्लिक करावं लागेल. तुम्ही passbook.epfindia.gov.in या नवीन पेजवर याल. याठिकाणी युजर नेम, तुमचा UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues