Take a fresh look at your lifestyle.

Mobile Data : तुमचा मोबाईल डेटा लवकर संपतोय? असा वाचवा मोबाईल इंटरनेट डेटा

0

Mobile Data सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईल डेटा मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. अनेकदा आपण डेटापॅक मारतो आणि काही दिवसातच किंवा काही वेळेतच हा डेटापॅक संपून जातो. मग डेटापॅक गेला कुठे हे आपण शोधात बसतो. पण स्मार्टफोन असल्याकारणाने अ‍ॅप्स व बॅकग्राउंडला डेटा जास्त वापरला जातो. म्हणून मोबाईल इंटरनेट डेटा कसा वाचवायचा त्याबद्दल काही खास टिप्स…

Auto Download : ऑटो डाऊनलोड :
प्ले स्टोअरवर जाऊन आॅटो डाऊनलोड बंद करा. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंंगमध्ये जावून आॅटो डाऊनलोड बंद करा. यामुळे अनावश्यक डेटा वापरला जाणार नाही.

Push Connect : डिसेबल पुश कनेक्ट :
नको त्या गोष्टी आॅटो डाऊनलोड होत राहतात. त्या टाळायच्या तर डिशेबल पुश कनेक्ट बंद करुन टाका. विशेषत: फेसबुकच्या सेटिंगमध्ये जा, अकाऊण्ट सेटिंगमध्ये जावून डेटा मेन्यू चेक करा. तिथं हा आॅप्शन मिळेल. तो बंद करा.

महत्वाच्या बातम्या : कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

फॉरवर्ड करू नका :
व्हॅट्सअपवर आपला जास्त वेळ जातो. आलेले मेसेज सतत फॉरवर्ड करणं किंवा फोटो आणि व्हिडीओ डाउनलोड करणं यामुळे जास्त डेटा वापरला जातो. त्यामुळेच फॉरवर्ड व अनावश्यक गोष्टी डाउनलोड करणं टाळा.

Data Monitor डेटा मॉनिटर :
आपण कधी, कशासाठी, किती डेटा वापरतो यासाठी आपल्या फोनमध्ये डेटा मॉनिटर असतो. सेटिंग मध्ये जाऊन अधुनमधुन तो चेक करा. आपला अनावश्यक वापर कशावर होतो ते तुमचं तुम्हाला कळेल. त्या गोष्टी बंद करा किंवा काढून टाका.

Wifi वायफाय वापरा :
तुमचा मोबाईल डेटा वापर जास्त असेल, मोठी कामं तुम्ही आॅनलाइन करत असाल तर घरी वायफाय घ्या. त्यानं बरेच पैसे वाचतील. किंवा ज्या ठिकाणी जाल त्याठिकाणी वायफायचा वापर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues