Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

India VS Sri Lanka ODI : भारताकडून श्रीलंकेचा 4 विकेट्सने धुव्वा, राहुल, सिराज, कुलदीपची निर्णायक खेळी

0

India Win 2nd ODI : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने चार विकेट्सनी विजय मिळवला. यासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील 2-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने भारतासमोर 215 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने 43.2 षटकात 6 विकेट गमावत 219 धावा करत सामना जिंकला. केएल राहुलने अर्धशतकीय निर्णायक खेळी केली.

India VS Sri Lanka ODI श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या सामन्यात जबरदस्त सुरुवात करुन देणारे रोहित-शुभमन स्वस्तात माघारी फिरले. रोहित शर्मा अवघ्या 17 धावा करून बाद झाला. तर शुभमन गिलदेखील 21 धावा करून परतला.

Social Media Income Source : आता घरबसल्या 15 सेकंदाचा Video बनवून तुम्ही कमाऊ शकता हजारो रुपये; तुम्हाला करावे लागेल फक्त हे काम

India VS Sri Lanka ODI मागील सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहलीही काही खास करु नाही. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तोही 28 धावा करुन बाद झाला.

India VS Sri Lanka ODI त्यानंतर हार्दिक पांड्याने 36 धावांची तर अक्षर पटेलने 21 धावांची चांगली खेळी केली. केएल राहुल शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 103 चेंडूंचा सामना करत नाबाद 64 धावा केल्या.

India VS Sri Lanka ODI त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 39.4 षटकांत सर्वबाद 215 धावा केल्या. नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 34 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. तर उमरान मलिकने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

आनंदाची बातमी ! 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews