Take a fresh look at your lifestyle.

तैवानी टरबूज आणि खरबूजाची लागवड करून अवघ्या काही महिन्यांतच कमवला ६0 लाखांपर्यंत नफा

0

बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील दरिडीह गावातील मुन्ना सिंग 20 एकरांवर तैवानच्या टरबूज आणि खरबूजाची लागवड करत आहेत. मुन्ना सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला अवघ्या तीन ते चार महिन्यांत 50 ते 60 लाख रुपयांचा नफा मिळतो.

पारंपरिक शेतीत फारसा नफा मिळत नसल्याचे पाहून शेतकरी आता नवीन पिकांकडे वळू लागले आहेत. यातील काही पिके परदेशी प्रजातींचीही आहेत. जोखीम पत्करून शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे. बिहारमधील कैमूर येथील शेतकरी मुन्ना सिंग गेल्या तीन वर्षांपासून तैवानच्या टरबूज आणि खरबूजाची लागवड करत आहेत. अवघ्या काही महिन्यांत या पिकातून त्यांना 60 लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळत आहे.

चार महिन्यांत 50 ते 60 लाखांचा नफा :
कैमूर जिल्ह्यातील दरिडीह येथील मुन्ना सिंह २० एकरवर तैवानच्या टरबूज आणि खरबूजाची लागवड करत आहेत. मुन्ना सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला अवघ्या तीन ते चार महिन्यांत 50 ते 60 लाख रुपयांचा नफा मिळतो.

एक एकर शेतीत 1 लाख रुपये खर्च :
मुन्ना सिंग सांगतात की, तैवानी टरबूज आणि खरबूज पिकवणे खूप फायदेशीर आहे. त्याची एक एकर लागवड करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यातून तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळतो. बाजारात या फळांची किंमत 30 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत आहे. याशिवाय सुमारे ४० जणांना त्यांनी या शेतीतून रोजगार दिला आहे.यातील 5 ते 6 जण त्याच्याकडे वर्षभर ठराविक पगारावर काम करतात. तर बाकीच्यांना तो दिवसाला २०० ते ३०० रुपये देतो.

तैवानी टरबूज-खरबूज आरोग्यासाठी फायदेशीर :
तैवानच्या टरबूज-खरबूजमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. ते चवीला खूप गोड असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन सुधारते, रक्तदाब कमी होतो. तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते. यासोबतच इतरही अनेक फायदे आहेत.

Brocoli Farming : दोन मित्रांनी केला शेतीत चमत्कार, ब्रोकोली पिकातून वर्षाला 10 लाखांची कमाई

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues