Take a fresh look at your lifestyle.

Budget 2023-24 : यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना काय आहेत अपेक्षा? जाणून घ्या थोडक्यात

0

भारत देशाच्या बजेटची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसे सर्वसामान्य देशवासीय त्याकडे आशेने पाहत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. हे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेत सादर करतील. दरवर्षीप्रमाणे याही अर्थसंकल्पाकडून देशवासीयांच्या विशेषत: मध्यमवर्गीयांच्या खूप अपेक्षा आहेत. कारण मागचे वर्ष महागाई, नोकरीत कपात आणि इतर अनेक कारणांमुळे खूप कठीण गेलं होतं. अशा परिस्थितीत नोकरदार व मध्यमवर्गाला यंदा करात सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. (What are the expectations from this year’s budget)

देशातील मध्यमवर्गीय लोकांना गेल्या काही बजेटमध्ये कर स्लॅब, कर दर किंवा स्टँडर्ड कपातीतील बदलांमुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही आणि कोरोना महामारीनंतर अशा लोकांसाठी उदरनिर्वाह करणं थोडं कठीण झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला यंदाच्या बजेटमधून काय काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया…

बजेट 2023-24 मधून सर्वसामान्यांना काय आहेत अपेक्षा?

  • Late GST Payment वरील टॅक्स 18% वरून 12% पर्यंत कमी व्हावा.
  • Highest Tax Rate 30% वरून कमी करून 25% करावा.
  • उत्पन्नाची मर्यादा 10 लाखांहून वाढवून 20 लाख रुपये करावी.
  • Section 80C ची मर्यादा 2 लाखांवरून 2.5 लाख रुपये करावी.
  • सुधारित कामगार कायद्यांची राज्यांकडून अंमलबजावणी व्हावी.

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पासाठी (Budget) अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत. कारण त्यांच्या घरचे बजेट या बजेटवरच अवलंबून असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues