Take a fresh look at your lifestyle.

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसची सुपरहिट ऑफर; महिना ५००० रुपये गुंतवा, ८ लाख मिळवा; वाचा सविस्तर

0

Post Office Schemes : विना जोखीम उत्तम परतावा मिळणाऱ्या बचत योजनेच्या तुम्ही शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला कमी गुंतवणूकीत ८ लाख रुपयांचे रिटर्न्स देईल. कारण नुकतेच केंद्र सरकारने छोट्या बचत योजनेंवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Krishi Sevak Bharti | कृषी विभाग मेगा नोकरभरती; पद, वेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून..

Post Office Schemes : विना जोखीम उत्तम परतावा मिळणाऱ्या बचत योजनेच्या तुम्ही शोधात असाल तर पोस्ट आॅफिसच्या रिकरिंग डिपाॅझीटच्या व्याजदरात ३० बेसिस पाॅईंट्सची वाढ झाली आहे. त्यामुळे हे व्याजदर ६.२० टक्क्यांवरून ६,५० टक्क्यांवर गेले आहे. हे व्याजदर जुलै ते सप्टेंबर २०२३ च्या कालावधीसाठी लागू आहेत. पुढील दहा महिने एकच रक्कम गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर आहे. पोस्ट खात्याच्या या योजनेत जोखीम कमी आणि परतावा जास्त आहे.

या योजनेत १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. तीन गुंतवणूकदार मिळूनही संयुक्त खातेदेखील उघडता येते.आपल्या पाल्याच्या नावानेही पालक या योजनेत पैसे गुंतवू शकतात. या योजनेची सुरूवात तुम्ही १०० रुपयांपासूनही करू शकतात. सर्वात आधी रिकरिंग डिपाॅझीट पाच वर्षांसाठी खुले केले जाऊ शकते. पण त्यानंतर Post Office Schemes मुदत पुढील ५ वर्षांपर्यंत वाढवता येते.

पोस्ट खात्याच्या रिकरिंग डिपाॅझीटमध्ये (Post Office Schemes ) सध्या ६.५ टक्के व्याज मिळत आहे. हे व्याज केवळ जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीसाठी लागू आहे. सरकार प्रत्येक तिमाहीनंतर व्याजदरात बदल करते. त्यानुसार या बचत योजनेचे व्याजदर कमी अधिक होत असतात.

Mulching Benefits : मल्चिंगची भूमिका काय ? उत्पादन आणि खर्चावर काय परिणाम; वाचा सविस्तर

पोस्ट खात्याच्या रिकरिंग डिपाॅझीट खात्यात १० वर्षांपर्यंत प्रत्येक महिना ५००० रुपयांची गुंतवणूक करून ६.५ टक्के व्याजदराने Post Office Schemes ८,४६ लाख रुपयांचे रिटर्न्स मिळेल. जर १० वर्षात जमा केलेली रक्कम ६ लाख रुपये असेल तर व्याजदर २.४६ लाख रुपये असेल. जर सरकारने व्याजदर वाढवले तर रिटर्न्सही चांगले मिळतील. हे खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी बंद करता येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues