Take a fresh look at your lifestyle.

Ajit Pawar : अहो, एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री आहात… अजित पवार असं का म्हणाले?

0

Ajit Pawar आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही की, ते राज्याचे मुख्यमंत्री आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ते सहज बोलतात, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला

कुकडी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

Ajit Pawar पवार म्हणाले, अहो एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री आहात. मात्र राज्याच्या मुखमंत्र्याच्याच ते मुख्यमंत्री आहे, हे लक्षात राहत नसेल तर काय कपाळ करावं? शिंदे- फडणवीस अशी जोडगोळी आहे की मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चाळीस दिवस दोघांनीच कॅबिनेट घेतली. कॅबिनेटमध्ये दोघे जोरात गप्पा मारत. त्यानंतर अठरा मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यांना पंधरा दिवस खातेवाटप केले नाही. एवढेच नाही तर तब्बल 45 दिवसांनी पालक मंत्र्यांची यादी जाहीर केली. या गोष्टींचा राज्याचा विकासावर मोठा परिणाम झाला आहे, असंही पवार म्हणाले.

Ajit Pawar मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करताना पवार म्हणाले, जर राज्याचे मुख्यमंत्री हे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असतील तर आपले राज्य कुठे चालले आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय शिवाय राहणार नाही. हातात गंडे- दोरे घालून काही होत नसते. मनगटात ताकद असावी लागते.

महापुरुषांच्या बाबतीत अपमानास्पद वक्तव्य करून शिंदे फडणवीस सरकारला नेमकं काय साध्य करायचे आहे? या पुढे असली वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, महाराष्ट्रात भाव ‘इतके’ घसरले, इतर पिकांचीही अवस्था वाईट

सर्व काही बदलतंय परंतु शेतकऱ्यांचे नशीब नाही! मागील पाच महिन्यात राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues