Take a fresh look at your lifestyle.

Krushi doot News : सर्व काही बदलतंय परंतु शेतकऱ्यांचे नशीब नाही! मागील पाच महिन्यात राज्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या

0

Krushi doot News भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांमध्ये आजही शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात सातत्यानं वाढ होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कि स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांत सरकार बदलली, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी नवनव्या घोषणा केल्या, परंतु एवढे करून देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. राज्याबाबत जर बोलायचे झाले तर महाराष्ट्रात मागील पाच महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. परंतु हे सरकार बदललं असलं तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील समस्या मात्र आजही कायम आहेत.

Krushi doot News आता तर शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत एक धक्कादायक आणि काळीज पिळवटणारी आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार.. यंदाच्या अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान, कर्जबाजारीपणा आणि वाढत्या महागाईमुळं गेल्या पाच महिन्यात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत तब्बल 475 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, महाराष्ट्रात भाव ‘इतके’ घसरले, इतर पिकांचीही अवस्था वाईट

Krushi doot News गेल्या एक वर्षाबाबत बोलायचे झाले तर मागील एक वर्षात मराठवाड्यात 939 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2021 डिसेंबरअखेर या भागात 887 आत्महत्या झाल्या होत्या तर त्याअगोदर म्हणजे 2020 मध्ये 773 आत्महत्या झाल्या होत्या.

Krushi doot News मागील ५ महिन्यात कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या :-

ज्यात जुलै महिन्यात 83 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, ऑगस्ट महिन्यात 123, सप्टेंबर 96, ऑक्टोम्बर 94 आणि नोव्हेंबर महिन्यात 79 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसात आम्ही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त राष्ट्र करू अशी घोषणा दिली होती परंतु मात्र जमिनीवरील वास्तव काही औरच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues