Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी कधी खुला होणार?

0

Samruddhi Mahamarg पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या हस्ते नागपूर येथून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी ( Nagpur to Shirdi ) या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण होणार आहे. रविवारी 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे शिर्डी इंटरचेंज येथून लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात येईल. माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर दुपारी 2 वाजेनंतर वाहतूक व दळणवळण सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होण्याची शक्यता आहे.

Samruddhi Mahamarg दरम्यान या प्रक्षेपण कार्यक्रमाच्या पूर्व तयारी, सोयी-सुविधांची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी इंटरचेंज येथे पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपूते, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे आदी अधिकारी उपस्थित होते.

Samruddhi Mahamarg 11 डिसेंबर रोजी शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रेक्षपण कार्यक्रमास महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. पंधराशे ते दोन हजार‌ नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी बंदीस्त मंडप उभारण्यात आला आहे. लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी 12 बाय 18 फूट उंचीचे 2 एलईडी उभारण्यात आले आहेत.

शिर्डी इंटरचेंज समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठा इंटरचेंज :
Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्गावर मुंबई ते नागपूर दरम्यान 24 इंटरचेंज (प्रस्थान मार्ग) आहेत. यात शिर्डी इंटरचेंज सर्वात मोठा आहे‌. या इंटरचेंज वर 16 टोल नाके (मार्गिका) आहेत‌. या 16 मार्गिकेच्यावर मध्यभागी एकच आधारस्तंभ असलेली सर्वात मोठी छत्री आहे. मनमाड- अहमदनगर, पुणतांबा – झगडे फाटा व सिन्नर-शिर्डी तीन राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना समृद्धी महामार्गावर शिर्डी इंटरचेंज येथून छेदून जातात, अशी माहिती प्रकल्प संचालक विश्वनाथ सातपुते यांनी दिली.

Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्गात अहमदनगर हद्दीत मनमाड- दौंड रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल व गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूल हे सर्वात आव्हानात्मक काम होते. सदर काम वेळेत पूर्ण करण्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता यशवंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : बातमी कामाची! शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार ‘इतके’ अनुदान

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews