Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून “गीर” गाय खास आहे बरं!

0

गायीमध्ये दूध उत्पादनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असणारी गाय म्हटलं कि, “गीर” गाय समोर येते. भारतात विशेषतः गुजरातचा पश्चिम व दक्षिण भाग, महाराष्ट्राचा गुजरातच्या सीमेलगतचा प्रदेश तसेच राजस्थान राज्यामधील टोंक व कोट आदी जिल्हे गीर गायींचे उगमस्थान मानले जातात.

याच भागांमध्ये या गायीची मोठ्या प्रमाणावर संशोधनात्मक उत्तम वंश निर्मिती आणि विक्री देखील केली जाते. सध्या गुजरातमध्ये या गायींवर मोठ्या प्रमाणावर संशोधनात्मक कार्य उंच वंशावळ प्राप्तीसाठी प्रयत्न सुरु आहे. त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘कॅटल ब्रिडींग फार्म’ जुनागड – अँग्री. युनि.

गायीची शारीरिक ठेवण :
● या गायी थोराड, उंच व भक्कम बांधण्याच्या असतात.
● त्यांची ठेवण नजरेत भरेल अशीच असते.
● भक्कम मोटे व भरदार डोके, शिंगे गोलाकार व मागून पुढे आलेली बुंध्यापासूनच जाड व बहुतांशी काळ्या रंगाची असतात.
● कान लांबलचक खाली पडलेले व नाकपुडी पर्यंत पोचणारे असतात.
● कानाच्या पाळ्यांचा रंग कडेला गडद काळसर छटेचा असतो.
● नाकपुडी संपूर्णपणे काळीभोर व चेहऱ्याचे मानाने लहान असते.
● डोळे लंबट गोल व काजळ घातल्यासारखे व अतिशय बोलके असतात, वशिंडे मोठे व घट्ट आकर्षक असते.
● या गायींच्या मानेखाली पोळी (लोळी) मोठी असते.
● पाय मोठे व भक्कम असतात, खूप काळे उंच व एकसंध असल्यासारखे दिसतात, मागे चौक उतरते नसतात.
● या गायी कोठीपोटात आखुड नसतात, लोंबी मोठी असते.
● छातीकडून कासेकडे जाणाऱ्या दूधाच्या शीरा सुस्पष्ट व नागमोठी असतात.
● या गायींच्या कासेची ठेवण मोठी व शरीराबाहेर जास्त असते.
● चारही स्तन लांबटगोल व समान अंतरावर असतात.
● शेपूट लांबलचक व गोंडा काळसर झुपकेदार असतो.
● निरण (सोवाळी) काळी व सैलसर ठेवणीची असते.
● रंग बहुतांशी तांबडा व त्यामधील विविध छटांचा असतो, क्वचित ठिपके असतात.

असे असतात या जातीचे बैल :

● हे बैल गायींप्रमाणेच धष्टपृष्ट व थोराड असतात.
● त्यांच्या मस्तकाची ठेवण चेहऱ्याच्या मानाने मोठी व नजरेत भरणारी असते.
● वशिंड मोठे व घट्ट आणि गडद अशा काळसर छटेचे असते.
● बैल लाबपौंडी, अत्यंत शांत व सुस्वभावी असतात.
● यामध्ये मारकेपणा क्वचीतच आढळतो.
● हे ओढकाम शेतीकामासाठी चांगले असतात. मात्र जरा मंदपणे चालतात.

बांधावर झाडे असावी का नसावी ? | बांधावर झाडे लावण्याचे फायदे | Krushidoot

पूर्ण वाढ झालेल्या गायीचे वजन साधारण: ३५० ते ४०० कि. ग्रॅ. तर बैलाचे वजन ४५० ते ५५० कि. ग्रॅ. पर्यंत असते.

पूर्णवाढ झालेल्या गायी व बैलांची मापे
शरीराची उंची I छातीजवळील लांबी I घेर
बैल – १४५ ते १८० सें.मी. I १५५ सें.मी. I २१० सें.मी
गाय – १२५ ते १२० से.मी. I १६०ते १३५ से.मी. I १३५ से.मी. १८० सें.मी

गायीच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय ३० ते ३८ महिन्यांचे असते. चांगल्या कालवडी २४ महिन्यांच्या सुद्धा माजावर आल्याची उदाहरणे आहेत. दुग्धोत्पादनाची क्षमता प्रथम वेतापासन तिसऱ्या वेतापर्यंत चढत्या कमानीची असते.

ही गायी प्रसिद्ध आहे ते सलग जास्तकाळ, उत्तम स्निग्धांश व भरपूर दुग्धोत्पादन यासाठी . सर्वसाधारण मेहनतीवर दिवसाकाठी ६ ते ७ लिटर दूध सहज देतात. तसेच एका वेतामधील सरासरी दुग्धोत्पादन ३२१० कि.ग्रॅ. मिळते. दोन वेतामधील अंतर १८ ते २४ महिन्यांचे तर दोन वेतांमधील भाकडकाळ १०० ते १५० दिवसापर्यंत असू शकतो.

या गुणवत्तेच्या गायीवर ब्राझील व अमेरीकेमध्ये संशोधन झाले व त्यातून ‘ब्राह्मणी’ ही गायी विकसित झालीय. ही गायी एकाच किणी व्यवस्थित सांभाळल्यास १० ते १२ वेणी एकाच घरी निश्चित होतात. यांची चांगली बैलजोडी १५ ते १८ वर्षे उत्तम काम करते. या जातीची खोंड वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शेतीकामात योग्य असतात.

या जातीचा वळू निश्चित करतात ‘हे’ निकष लक्षात ठेवा!
● वळूपासून मिळणारे मादी वासरांचे प्रमाण.
● उपजत वासरे उत्तम वाढीची व निकोप असणे.
● गायीची सर्व चिन्हे वासरांमध्ये संक्रमीत होणे.
● मादी वासरांचे प्रथम माजावर येण्याचे वय.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues