Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अत्यंत देखणी व फायदेशीर गाय “देवणी”

0

मराठवाडा भुषण असो किंवा अनेक ठिकाणी मानांकन सिद्ध करणारी गायी म्हणून “देवणी” गायीला ओळखले जाते. आज या लेखामध्ये आपण या गायीविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत…

“देवणी” गाय अत्यंत देखणी, विविध स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये मानांकन सिद्ध करणारी, “मराठवाडा भुषण” म्हणून देखील परिचित आहे. ही गाय विदेशी संकर केल्यास दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेची व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारी आहे.

साधरणतः २०० वर्षापूर्वी डांगी व गीर गायीच्या संकरामधून मराठवाड्यात ‘देवणी’ गायी उदयास आली. महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, हरंगूळ, देवणी, निलंगा, अहमदपूर येथे तसेच मोठ्या प्रमाणांवर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बिड या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात खास हौशीने विक्रीसाठी पैदास करणारे शेतकरी दिसतात.

या गायीची शारीरिक ठेवण मध्यम आकारारी व आपोटशीर बांध्याची आहे. गायीचा मूळ रंग पांढरा व त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे पट्टे (ठिपके) दिसून येतात. या गायींच्या कातडीला विलक्षण अशी चमक पाहायला मिळते. तिची त्वचा अत्यंत मऊ आणि कातडी शरीराला घट्ट चिकटलेली असते.

गायीच्या कपाळाची ठेवण भरदार व नजरेत भरणारी असते. शिंगे बाकदार व दंडगोलाकृती असतात. त्यांचा रंग काळा, डोळे लांबट व अंडाकृती असतात, पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात. या गायींच्या बैलांच्या नजरेत जरब असते व कायम रोखून बघण्याची सवय असते. कान मध्यभागी पसरट, टोकाला गोलाकार व मागे पडलेले असतात. नाकपुडी काळी पसरट व मध्यभागी फुगीर असते. वशिंड पिळदार व शरीराच्या एका बाजूस थोडे झुकलेले असते.

शरीराला शोभेल अशी मानेखालची पोळी (लोळी) असते. मान लांब व रुंद असते, बैल लांब पौंडी असतात. तसेच मागचे पाय शरीराच्या मानाने किंचित उंच व मांड्या पुष्टदार असतात. पाठ मागच्या बाजूने वशिंडाकेड किंचित उतरती असते. खूर संपूर्णत: काळे व भक्कम असतात. त्यामुळे हे बैल कमी उगाळतात व नालबंदाचा खर्च देखील कमी होतो.

बांधावर झाडे असावी का नसावी ? | बांधावर झाडे लावण्याचे फायदे | Krushidoot

शेपूट मागच्या ढोपरा पर्यंत येणारी व गोंडा काळा किंवा पांढरा झुपकेदार असतो. गायींमध्ये कास कासंडीसारखी गोलकार व शरीराबाहेर जास्त न येणारी असते. चारही सड (स्तन) गोलाकार व बहुतांशी काळ्या रंगाचे असतात. या गायीची उभे राहण्याची पद्धत ऐटबाज असते. ही गायी शांत व सुस्वभावी म्हणून ओळखली जाते असते.

या गायीच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याची वय साधारणपणे ३० ते ३५ महिन्यांपर्यंत असते. परंतु उत्तम मेहनतीवर २४ ते २७ महिन्यांपर्यंत माजावर येऊन गाभण राहिल्याच्या नोंदी देखील आहेत. ऐन दुधाच्या भरात दिवसाकाठी ६ ते ७ लिटर दूध देतात. दूध सलगपणे विना तक्रार अंत १८ ते २१ महिने देतात. या गायींच्या दोन वेतांमधील अंतर १८ ते २१ महिन्यांचे असते. तसेच भाकडकाळ हा ४ ते ६ महिन्यांचा असू शकतो. दुधाला सरासरी फॅट ३.५ ते ४.५ लागते.

विशेषतः या बैलांना मराठवाड्यामधील तीव्र उन्हामध्ये काम करण्याची शक्ती ही निसर्गाची देणगीच आहे. अगदी तीन वर्षाची खोंडे शेतीकामात हलक्या कामासाठी वापरण्यास सुरुवात करू शकता. खोंड संपूर्णत: दाती जुळला की खच्चीकरण करा. एकजागी उत्तमरीत्या सांभाळलेले बैल २० ते २२ वर्षांपर्यंत काम करतात. या जातीचे बैल क्वचितच मारके निघतात. पूर्ण वाढ झालेल्या या गायीचे वजन ३५० ते ४५० कि.ग्रॅ. पर्यंत तर बैलाचे वजन ५०० ते ६०० कि. ग्रॅ. पर्यंत असू शकते.

पूर्ण वाढ झालेल्या गायीचे आकारमान असे :
शरीराची उंची I छातीजवळील लांबी I घेर
गाय १२० सें.मी. I १२५ सें.मी. I १५० सें.मी.
बैल १३५ सेंमी. I १४० सें.मी. I १८० सें.मी.

या जातीच्या बैल जोडीची किंमत अंदाजे १.५० लाख तर चांगल्या गायीची किंमत रु. ३५ ते ४० हजारापर्यंत असते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews