Take a fresh look at your lifestyle.

‘या’ सोप्या पद्धतीने नाहीसे करा गाजर गवत!

0

गाजर गवताने अनेक शेतकऱ्यांना नको-नको करुन सोडलंय. या गवत प्रकाराला काही ठिकाणी काग्रेस नावाने देखील ओळखले जाते. हे गवत शेत जमिनीवर मोठ्या जोमात उगवते. मात्र या गवतामुळे पेरणीसाठी जमीन तयार करणे कठिण होऊनबसते. दरम्यान या गवताला नष्ट करण्यासाठी रासायनिक खाद्य किंवा हाताने उपटावे लागते. मात्र हे गवत विषारी असल्याने त्याची एलर्जी होते. हे गवत अमेरिकेची देण असल्याचे बोलले जाते.

साधारणतः १९५० मध्ये अमेरिकेहून भारतात या गव्हाची निर्यात करण्यात आली होती. या गव्हाबरोबर गाजर गवताच्या बियाही अमेरिकेहून आल्या. १९५५ मध्ये पुण्यात हे गवत सर्वात प्रथम आढळले. या गवताशी दोन हात करण्यास शेतकऱ्यांना कठीण होऊन बसतं. मात्र आता हे काम सोपं होणार आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने या गवताची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.

स्थानिक पातळीवर संशोधन करून याबाबतचा हा अहवाल भारतीय कृषी अनुसंधान केंद्राकाडे पाठविण्यात आला आहे. ठाकूर छेदीलाल बॅरिस्टर कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. आरकेएस तोमर यांनी या गवताच्या निर्मूलनाविषयी मोठे संशोधन केले आहे.

बांधावर झाडे असावी का नसावी ? | बांधावर झाडे लावण्याचे फायदे | Krushidoot

भारतीय कृषी अनुसंधान केंद्राने मंजुरी दिली कि, कीटकांचा झुंड गाजर गवत असलेल्या परिसरात सोडला जाईल. मॅक्सिकन बीटलचं शास्त्रीय नाव आहे, जाइकोग्रामा बॅकोलोराटा. या बीटल कीटकाचा प्रजनन काळ जुलै आणि ऑगस्ट महिना असतो. दरम्यान या कीटकाला गाजर गवतावर ठेवले जाते. हे एका आठवड्याच्या आत पानांना खाऊन गाजर गवत नष्ट करते.

हे गवत जनावरे आणि माणसांसाठी हानीकारक आहे. या गवताची अनेकांना अ‍ॅलर्जी देखील होत असते. या गवतामुळे अस्थमा आणि त्वचेचे आजार होतात. या गवतांविषयी खरपतवार विज्ञान संशोधन केंद्रात संशोधन झाले आहे. या गवतात सेस्क्वेटरिन लॅक्टन नावाचा विषारी पदार्थ सापडलाय. आपल्या क्षेत्रातील ४० ते ४५ पिकांचे नुकसान हे गवत करते. तर दूध उत्पादकांही याचा फटका बसतो. जर दुधाळ प्राण्यांनी हे गवत खाल्ले तर दुग्ध उत्पादनाची क्षमता ४० टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे हे नष्ट करणे गरजेचे आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues