Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot : नव्या वर्षात ‘हे’ नियम बदलणार; लवकरात लवकर करून घ्या हे महत्त्वाची कामे

0

Krushidoot 2022 हे वर्ष संपण्यासाठी आता काहीच दिवस बाकी आहे. आपल्या पैकी सर्वांचं नवं वर्षाचे वेध लागले आहेत. परंतु, नवं वर्षातील तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे महत्वाचे आहे.. कारण येत्या नवीन वर्षात काही नियम बदलणार आहेत. या नियमांचा बदल तुमच्या खिशावरही पडणार आहे. नवीन वर्षात नव्याने लागू होणाऱ्या नियमांचा परिणाम तुमच्या बजेटवर देखील होण्याची शक्यता आहे. हे बदल कोणते आहेत हे जाणून घेऊया..

Krushidoot पॅन कार्ड आणि आधार लिंक करणे आवश्यक :

जर तुम्ही अजूनही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर हे काम लवकर करणे आवश्यक आहे. आयकर विभागाने एप्रिल 2023 पर्यंत पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्याची मर्यादा वाढवली आहे, पण यामध्ये उशीर झाल्यास तुमच्या बँकेशी निगडित अनेक अडचणी येऊ शकतात.

क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल होणार :

पुढील वर्षात क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार असून क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट मिळणार आहेत. नवीन वर्षाआधी हे रिवॉर्ड पॉईंट रिडीम (Redeem) करुन घ्या. तसेच 1 जानेवारीपासून काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंटच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. असे रिवॉर्ड पॉईंट्स डिसेंबर महिन्यामध्येच वापरुन घ्या.

CNG आणि PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता :

पुढील वर्षात सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलण्याची शक्यता असून पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेचा इंधनाच्या नवीन किंमती जारी केल्या जातात.

विमा प्रीमियम महागण्याची शक्यता :

2023 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम महाग होण्याची शक्यता असून लोकांना महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : गुडीपाडवा, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी जाणून घ्या; 2023 मधील मोठ्या सणांच्या तारखा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues