Take a fresh look at your lifestyle.

Loan Interest Rate : आता कर्ज घेणे पुन्हा महागणार, RBI कडून रेपो रेट मध्ये पुन्हा एकदा वाढ

0

Loan Interest Rate महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाचा भार आणखी वाढणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षातील शेवटच्या महिन्यात म्हणजे अर्थातच या डिसेंबर महिन्यामध्ये रेपो दरात पुन्हा वाढ केली आहे. गेल्या 8 महिन्यांत पाचव्यांदा RBIनं रेपो रेटमध्ये वाढ केली असून शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 पॉइंटची वाढ करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

Loan Interest Rate या घोषणेनंतर आता एकूण रेपो रेट Repo Rate 5.9 टक्क्यांवरून थेट 6.25 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत रेपो रेट तब्बल 225 टक्क्यांनी वाढला आहे. यावाढीचा अप्रत्यक्ष परिणाम आता गृहकर्ज आणि बँकांकडून इतर गोष्टींसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेपो रेटचा EMI शी नेमका काय संबंध?

Loan Interest Rate 2022 हे वर्ष संपता संपता रेपो रेट हा 6 टक्क्यांच्या घरात गेला आहे. व्याजदरवाढीचा बोजा स्वत: सहन न करता तो भार ग्राहकांवर टाकणं हे बँकांसाठी नित्याचं आहे. बँकांच्या नफ्याचं प्रमाण किती आहे यावर व्याजदर वाढीचा बोजा आपण सोसायचा का? किती सोसायचा? हे कर्जदात्या बँका व वित्तसंस्था ठरवतात. थकित कर्जांचं प्रमाण जास्त असलेल्या वित्तसंस्थांची बॅलन्स शीट सक्षम नसल्याने व्याजदरवाढीचा बोजा तुमच्यावर ढकलला जाऊन तुमचा ईएमआय वाढायची शक्यता जास्त आहे.

हेही वाचा : ‘या’ 5 बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा!

Loan Interest Rate दरम्यान, देशात महागाई अजूनही सर्वोच्च पातळीवर आहे. येत्या काही महिन्यांत महागाई नियंत्रणात आली नाही तर याचा सर्वाधिक फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues