
shettale yojana anudan मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान
shettale yojana anudan मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून (mukhyamantri shashwat sinchan yojana) वैयक्तिक शेततळ्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेची नवी कार्यपद्धती कृषी आयुक्तालयाकडून लवकरच जारी केली जाईल.
Pune : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळ्यासाठी ( Farm Pond) ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान (Grant For Farm Pond) मिळणार आहे. या योजनेची नवी कार्यपद्धती कृषी आयुक्तालयाकडून (Agriculture Commissionerate) लवकरच जारी केली जाणार आहे.
shettale yojana anudan या योजनेमध्ये खोदणी यंत्राद्वारे शेततळे खोदण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, राज्यात शक्य होईल त्या ठिकाणी शेततळे खोदाईची सांगड महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेशी घालावी, अशी सूचना कृषी खात्याचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी जारी केलेल्या शासन निर्णयात केली आहे. शेततळ्यांचे अनुदान वाटताना महाडीबीटीचा (MAHA DBT) वापर केला जाणार असून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड सोडतीद्वारे (Lucky Draw) केली जाणार आहे.
Loan For Land : जमीन घेण्यासाठी कर्ज घेताय ? तर या महत्वाची माहिती नक्की वाचा
shettale yojana anudan ३० मीटर बाय २५ मीटर बाय ३ मीटर तसेच ३० मीटर बाय ३० मीटर बाय ३ मीटर या दोन्ही श्रेणीतील शेततळ्यांसाठी आता ७५ हजारापर्यंत अनुदान मिळेल. पूर्वी अनुदानाची रक्कम ५० हजार रुपयांपर्यंत होती. मात्र, अनुदान जमा करताना शेतकऱ्याच्या आधार संलग्न बॅंक खात्याचा वापर करावा लागणार आहे.
shettale yojana anudan शेततळ्यांमुळे महाराष्ट्रात नगदी शेतमाल उत्पादनाला चांगलीच चालना मिळाली आहे. विशेषतः फळे व भाजीपाला उत्पादनात शेततळ्यांची भूमिका मोलाची ठरली आहे. आपल्या राज्याचा ८० % पेक्षा जास्त भाग कोरडवाहू असल्यामुळे सिंचन सुविधा तयार केल्या तरच शेतकरी उत्पन्नात भर पडते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच राज्य शासनाने शेततळ्यांना अनुदान देणारी योजना पुढे आणली. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात या योजनेसाठी एक लाखापर्यंत अनुदान देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, योजना घोषित होताना अनुदान रक्कम केवळ ५० हजार रुपये ठेवण्यात आली.
माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/