Take a fresh look at your lifestyle.

मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी ही योजना खूपच लाभदायी! दररोज 416 रुपये जमा केल्यास मिळेल 65 लाख रुपयांचा निधी

0

मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी भारत सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातूनमुलींचा भविष्यकाळ हा आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम आणि सुरक्षित होईल,हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. याच उद्देशानेकेंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज तुम्ही 416 रुपये बचत करून तुमच्या मुलीला 65 लाख रुपयांची अनमोल भेट देऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना बद्दल बोलायचे झाले तर एक दीर्घकालीन योजना असून या योजनेत पैसा जमा करून तुम्ही तुमच्या मुलीचे शिक्षण आणि भविष्याबाबतनिश्चिंत आणि खात्रीशीर राहू शकता.

सुकन्या समृद्धी योजना नेमकी काय आहे? :
सुकन्या समृद्धी योजना एक दीर्घकालीन योजना असून या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीचे शिक्षणआणि भविष्यकाळ आर्थिक दृष्टीने भक्कम आणि सुरक्षित करू शकता.
तुम्हाला यासाठी फार मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची गरज नसून तुमची मुलगी जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा तुम्हाला तिच्यासाठी किती पैशांची गरज भासेल यावर तुमची गुंतवणूक तुम्हाला किती पैसे जमा काय करावे लागतील हे ठरते.

हेही वाचा : चाळीतला कांदा टिकेल दीर्घकाळ ! फक्त ‘हे’ तीन तंत्रे राहू द्या कायम लक्षात

एका वर्षात दीड लाख रुपये जमा करू शकता :
मुलीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या भक्कम करण्यासाठी सरकारची ही लोकप्रिय योजना असून दहा वर्षापर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते. यामध्ये तुम्हाला कमीत कमी दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये जमा करता येतात. मुलगी जेव्हा 21 वर्षाची झाल्यावर या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड पूर्ण होईल. या योजनेतील तुमची गुंतवणूक किमान मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लॉक केली जाईल.

यामध्ये या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मुलीचे वय अठरा वर्ष होईलतेव्हा अठरा वर्षानंतरतुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून 50 टक्के पैसे काढता येते.या पन्नास टक्के काढलेल्या पैशांचा उपयोगमुलगी ची पदवी किंवा पुढील शिक्षणासाठी करू शकते.दहा वर्षानंतर 21 वर्षाची मुलगी होईल तेव्हा सर्व पैसे काढता येईल.

या योजनेचे महत्वाची वैशिष्ट्ये :
या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला संपूर्ण एकवीस वर्षे पैसे जमा करण्याची गरज नाही. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर 15 वर्षांसाठीच पैसे जमा करता येतात.मुलीच्या वयाच्या 21 वर्षापर्यंत व्याज मिळत राहील.
सध्या केंद्र सरकार यावर 7.6टक्के वार्षिक दराने व्याज देत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues