Namo Shetkari Yojana | बाप्पाच्या आगमनापूर्वीचं बळीराजा सुखावणार; ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार, वाचा सविस्तर माहिती
Namo Shetkari Yojana : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’अंतर्गत जाहीर केली. कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागांमधील १०० शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केली आहे. आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार आहे.
मित्रांनो राज्यभरातील ८६ लाख शेतकऱ्यांना Namo Shetkari Yojanaचा पहिला हफ्ता २००० रु.जमा केला जाणार आहे.राज्यभरात सध्या सर्व शेतकरी अडचणीत असल्याचे पहायला मिळत आहे दुष्काळ मुले शेतकऱ्यांची पिके पाण्या अभावी जळून गेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता २००० रु.चा पहिला हफ्ता जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
PM Vishwakarma Yojana : पारंपरिक कारागिरांना देशात मिळणार ओळख! ही योजना आहे खूप फायद्याची!
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या हफ्त्यासाठी आता यादी जरी फायनल झाली असली तरी पुढील हफ्त्यांसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन आपल्या मोबाईल मधून किंवा CSC केंद्रामध्ये जाऊन अर्ज करायचे आहेत आणि त्यानंतर शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेच्या पात्रता,अटी व इतर सर्व माहीती व्यवस्थित पाहून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
योजनेचे नाव | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना |
विभाग | महाराष्ट्र कृषी विभाग |
योजनेचे उद्दिष्ट | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत |
लाभ | वार्षिक ६००० रु |
लाभार्थी संख्या | ८५ लाख ६६ हजार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Namo Shetkari Yojanaचा पहिला हफ्ता कधी येणार ?
शेतकरी मित्रांनो तास पाहिले तर Namo Shetkari Yojana पहिला हफ्ता ऑगस्ट महिन्यातच शेतकऱ्यांना मिळणार होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आणि अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याने योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब झाला आहे.

शेतकऱ्यांना Namo Shetkari Yojana पहिला हफ्ता देण्यासाठी आता सर्व त्रुटी दूर झाल्याअसून मंत्री मंडळ बैठकीत देखील आता या साठी हिरवा कंदील मिळालेला असून शेतकऱ्यांना आता २५ सप्टेंबर च्या आस पास पहिला हफ्ता दिला जाणार असल्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,कृषिमंत्री आणि सोबतच राज्यातील काही लाभार्थी शेतकऱ्यांना देखील एका कार्यक्रमास बोलवून नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Namo Shetkari Yojana साठी नवीन अर्ज करता येईल का ?
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अजूनही तुम्हाला संधी आहे नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी नवीन नोंदणी सुरु आहे आणि शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले नाव या योजनेत नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे.
Namo Shetkari Yojana पात्रता :
• लाभ घेणारा शेतकरी हा अल्पभूधारक असावा. (२ हेक्टर किंवा ५ एकर पेक्षा कमी क्षेत्र नावावर असावे.)
• लाभार्थी शेतकरी पती-पत्नी दोघांपैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
• लाभ घेणारा शेतकरी हा आमदार,खासदार,जि.प.सदस्य किंवा पं.स.सदस्य नसावा.
• लाभार्थी शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
• लाभार्थी शेतकरी Income Tax भरणारा नसावा.
• शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र ८ अ उतारा असावा.
• शेतकऱ्याच्या नावावर जमीन हि २०१९ च्या आधी झालेली असावी.