Take a fresh look at your lifestyle.

Old Calender DIY : जुन्या कॅलेंडरचा असा करा उपयोग

0

Old Calender DIY वर्ष बदललं की, कॅलेंडर जुन होतं. मग ते अडगळीत पडतं. पण या जुन्या कॅलेंडर्सचाही चांगल्या पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो, तो कसा त्याबद्दल जाणून घेऊयात…

1) कॅलेंडरचा कागद जाड आणि ग्लॉसी असतो. त्यापासून चांगले बुकमार्क्स बनवता येतात.

2) कॅलेंडरवर सुंदर डिझाईन्स असतील तर कोलाज बनवता येईल. एका मोठ्या शीटवर डिझाईन्स चिकटवा आणि कल्पकतेने सजवा.

3) कॅलेंडरमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो, नृत्यमृदा, देव-देवतांचे फोटो अथवा लँडस्केप पेंटींग असल्यास त्याच्या फ्रेम्स बनवता येतील. या फ्रेम्स तुमच्या भिंतीची शोभा वाढवतील.

4) आपण मुलांसाठी पझल गेम्स विकत आणतो. मात्र कॅलेंडरच्या जाड कागदांवरील चित्र कापून, ती पुठ्ठ्यावर चिकटवून घरीच पझल गेम्स तयार करता येतील. या कामी मुलांचीही मदत घेता येईल.

5) कॅलेंडरचा रंगीत भाग फोल्ड करून एनव्हलपसाठी वापरता येईल.

6) कॅलेंडरच्या कागदापासून छोट्या-मोठ्या पेपरबॅग्ज तयार होऊ शकतात.

7) मुलांच्या प्रोजेक्टसाठी कॅलेंडरमधील आकडे, महिने, वर्ष, तिथी, डिझाईन्स, समाजसुधारकांचे फोटो आदी सर्वांचा उपयोग होऊ शकतो.

8) विविध कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या आकाराच्या झिरमाळ्या, डिझाईन्स करून तुम्ही सुशोभन देखील करू शकता.

हेही वाचा : Goa Trip : नववर्षात गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues