Take a fresh look at your lifestyle.

Neem Coated Urea : शेतकरी मित्रांनो, निमकोटेड युरियाचा वापर आहे खूप फायदेशीर.. असा करा वापर वाढेल तुमचे उत्पादन

0

साध्या युरिया पिकांना उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असून, त्यावर निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर राहू शकतो.

पिकांच्या संतुलित वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये प्रामुख्याने आवश्यक असतात. त्यातही पिकाच्या सुरवातीपासून वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये नत्राचा वापर अधिक प्रमाणात होतो. या अन्नद्रव्यांमुळे पीक हिरवेगार आणि तजेलदार दिसत असल्याने शेतकरी याचा वापर अनेकवेळा अंसुतलित व गरजेपेक्षा अधिक करत असल्याचे आढळले आहे. परिणामी पिकांची वाढ समतोल होत नाही. पिकांची वाढ खुंटते. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्याचा दुष्परिणाम पिकांच्या उत्पादनावरही होतो.

युरिया वापरल्यानंतर होणारी प्रक्रिया :
युरिया जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो त्वरित विरघळतो. त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होते. मात्र, पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास होणाऱ्या निचऱ्यासोबत जमिनीत खोलवर जातो किंवा प्रवाहासोबत वाहून जातो. परिणामी भूजल किंवा परिसरातील स्रोत प्रदूषित होतात. जमिनीवर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर त्यातून नायट्रस ऑक्साइड तयार होऊन हवेत निघून जातो. यामुळे वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले. नत्र या घटकाचा ऱ्हास होऊन, पिकासाठी त्याची उपलब्धता कमी होते. जमिनीतून दिलेल्या एकूण युरियापैकी केवळ ३० ते ४० टक्केच नत्र पिकांना उपलब्ध होते. उर्वरित नत्र हवेत किंवा पाण्यामध्ये मिसळून वाया जाते. यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे.


Farmer Production Organization : शेतकरी उत्पादक गट काय आहेत? त्यातून शेतकऱ्यांना काय मदत मिळेल?

निम कोटेड युरिया ठरतो उपयुक्त :
युरियाची विरघळण्याची क्रिया मंद करण्यासाठी त्यावर कडूनिंब तेल किंवा द्रावणाचा थर दिला जातो. या द्रावणामध्ये युरिया वापरण्याचे प्रमाण साधारणपणे ०.१:१०० असे असते.
युरियाच्या दाण्यावर कडूनिंब द्रावणाच्या आवरणामुळे विरघळण्याच्या वेग आटोक्यात किंवा मंदावतो. परिणामी नत्र एकदम उपलब्ध न होता हळूहळू पिकांना मिळत राहते.
युरियाचे विघटन होऊन त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतराचे प्रमाण कमी होते. हवेतील प्रदूषण टळते.
विशिष्ट अशा कडवट वासामुळे कीटक पिकाजवळ येत नाहीत. पिकाचे किटकांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
भात शेतीमध्ये निमकोटेड युरियाचा वापर केल्यामुळे नीलगाय शेतापासून दूर राहत असल्याचा अनुभव आहे.
हवेतील आर्द्रता शोषल्यामुळे साध्या युरियाचे काही दिवसांनंतर गोळे तयार होऊ लागतात. शेतात वापर करण्यात अडथळे येतात. निमकोटेड युरियामध्ये गोळे होण्याचे प्रमाण कमी आहे.
साध्या युरियाची नत्र वापर क्षमता १० ते १५ टक्के असते, तर निमकोटेड युरियाची वापर क्षमता ४० ते ४५ टक्के असते. परिणामी निमकोटेड युरियाच्या वापरामुळे उत्पादनात ५ ते १० टक्केपर्यंत वाढ दिसून आलेली आहे.
अशाप्रकारे शेतीमध्ये निमकोटेड युरियाचा वापरामुळे जमीन, हवा आणि पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पीक उत्पादन खर्चही कमी होतो. यासाठी केंद्र शासनाने मे २०१५ पासून देशात उत्पादित होणारा युरिया व डिसेंबर २०१५ पासून आयात केलेला युरिया निम कोटिंग करूनच पुरवठा व विक्री करणे बंधनकारक केले आहे.

Cow Dung Cake Business Idea : शेणापासून फरशा बनवण्याचा व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

आता थांबेल शेतकऱ्यांची फसवणूक… वाचा खतांचे अधिकृत दर…

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues