Take a fresh look at your lifestyle.

National Consumer Day 2022 : राष्ट्रीय ग्राहक दिन : ग्राहकाला मिळालेले सहा हक्क नक्की जाणून घ्या..!!

0

भारतातील राष्ट्रपतींनी 24 डिसेंबर इ.स.1986 रोजी या ग्राहक हक्क कायद्याला मंजुरी दिली होती. तेव्हा पासून दर वर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.

ग्राहकांच्या सहा हक्काविषयी :

सुरक्षेचा हक्क :

National Consumer Day 2022 आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो त्या वस्तूच्या सुरक्षिततेची सर्वस्व जबाबदारी उत्पादकांची असते. वस्तू विकत घेताना त्या सुरक्षित असाव्यात आणि ग्राहकाच्या सुरक्षेची जबाबदारी विक्रेता कडे असावी नंतर त्या वस्तूच्या कंपनीची असावी.

माहिती मिळविण्याचा हक्क :

▪️या कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडित सर्व माहिती जसे की त्याची गुणवत्ता, प्रमाण, किंमत त्या मधील शुद्धता एक्स्पायरी डेट या सर्व बाबींची माहिती मिळविण्याचा हक्क आहे. ( राष्ट्रीय ग्राहक दिन )

निवड करण्याचा हक्क :

▪️ग्राहकाला कोणत्या ही कंपनीच्या उत्पादनाला निवडण्याचा हक्क आहे. आज बाजारपेठेत हजारो च्या प्रमाणात कंपन्या आहे. त्यावर त्यांच्या योजना किंवा ऑफर देखील सुरू असतात.

मत मांडण्याचा हक्क :

▪️प्रत्येक ग्राहकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या काही वस्तू मध्ये बिगाड झाले असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात आपले मत मांडण्याचा हक्क आहे.

ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा हक्क :

ग्राहक शिक्षण हक्क मिळविण्यासाठी ग्राहकाला जागृत करण्यासाठी सरकारद्वारा वेगवेगळे उपक्रम राबविले जाते. जसे की जागो ग्राहक जागो. तसेच बरेच शिबीर आणि कार्यशाळा घेतल्या जातात.

तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क :

▪️उत्पादना विषयी असो,व्यवसायका विषयी असो, कंपनी विषयी असो ग्राहकाची फसगत झाली असेल तर या कायद्याच्या अंतर्गत ग्राहक आपली तक्रार करू शकतो आणि ग्राहक मंचाला किंवा ग्राहक निवारण केंद्राला त्याचे निराकरण करावे लागते.

ग्राहक म्हणून हे लक्षात ठेवा –

▪️कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता. तसेच स्वच्छतागृहाचा वापर करू शकता.

▪️सुटे पैसे नाही म्हणून दुकानदार गोळ्या चॉकलेट देऊ शकत नाही.

▪️दिलेले वचन न पाळल्यास कंपनीच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.

▪️शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता चांगली नसल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.

▪️रुग्णालयात देखील हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते.

▪️चित्रपट गृहांमध्ये खाद्य नेण्यास बंदी नाही.

हेही वाचा : कोरोना पार्श्वभूमीवर राज्यासाठी नवी नियमावली जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues