Take a fresh look at your lifestyle.

Dr. APJ Abdul Kalam : विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे काही अनमोल विचार नक्की वाचा

0

Dr. APJ Abdul Kalam Thoughts : देशाचे 11 राष्ट्रपती राहिलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा आपल्याला थक्क करणारा आहे. आणि तितकाच विद्यार्थ्यांना व तरूणांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना संपूर्ण जगात ‘मिसाईलमॅन’ या नावाने देखील ओळखले जायचे. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी नकारात्मकता, नैराश्य, अपयशाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग दाखवला आहे. आज आपण त्यांचेच काही सकारात्मक विचार आजच्या या लेखात मांडणार आहोत.

Dr. APJ Abdul Kalam Suvichar कलाम यांचे काही अनमोल विचार :

▪️ जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झाला असाल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.

▪️ पहिल्या यशानंतर कधीही विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले होते.

▪️ जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.

▪️ सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.

▪️ यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

▪️ जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे 3 लोक आहेत जे ते करू शकतात. हे तीनजण म्हणजे वडील, आई आणि शिक्षक आहेत.

▪️ जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते.

नोकरी बदलण्याचा विचार करताय? ‘हे’ महत्त्वाचे प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues