Take a fresh look at your lifestyle.

Corona Viras : कोरोना पार्श्वभूमीवर राज्यासाठी नवी नियमावली जाहीर

0

चीनसह (china) अनेक देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने (corona viras) थैमान घातल्यानंतर भारतातही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे आतापर्यंत 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातही त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घ्यायला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर राज्यात खबरदारीचे उपाय म्हणून अनेक प्रमुख मंदिर प्रशानसनही आपल्या भाविकांना काही नियम घालून दिले आहेत. तसेच आयएमएने देखील राज्यातील जनतेसाठी काही नवीन नियमावली जारी केली आहे.

राज्यातील या प्रमुख मंदिरांत प्रवेश करतांना हे नियम पाळणे बंधनकारक –

▪️ राज्यातील प्रमुख मंदिरात संबंधित मंदिर समिती/संस्थान यांच्याकडूनच मंदिर परिसरात भाविकांना मास्क घालण्याचे आवाहन करणारे फलक लावले जात आहेत.
▪️ शिर्डीतील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करावा लागणार आहे.
▪️ पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी येताना भक्तांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.
▪️ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात फक्त कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्ती केली आहे.
▪️ मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :- आगामी आयपीएल स्पर्धेसाठी आज होणार लिलाव; जाणून घ्या कोणत्या संघाकडे किती स्लॉट व किती रक्कम शिल्लक

‘या’ गव्हाचे उत्पादन घ्या आणि नफ्याची चिंताच सोडा…!

आयएमएच्या नवीन मार्गदर्शिकेत काय –

  1. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे, असे आवाहन आयएमएने केले आहे
  2. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा
  3. IMA ने सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले.
  4. सार्वजनिक मेळावा टाळण्याच्या सूचना आयएमएने केल्या आहेत.
  5. शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
  6. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या लक्षणांसाठी चाचणी घ्या
  7. लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा, असे आवाहन आयएमएने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues