Take a fresh look at your lifestyle.

IPhone in india : कधी विचार केलाय का, भारतात iphones महाग का? ही आहेत कारणे

0

IPhone in india आयफोन घेणं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं. पण या स्वप्नांना ख्वाडा बसतो तो किंमतीने कारण आयफोनच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. परिणामी आयफोन घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जातं. जरी आयफोन भारतात महाग असला तरी तो इतर देशात बराच स्वस्त आहे. काय कारण असू शकतं बरं याला? का इतका महाग आहे भारतात आयफोन? त्याबद्दल आज जाणून घेऊयात…

IPhone in india कस्टम ड्युटी : आयफोन भारतात दाखल झाला कि त्यावर कर सुरु होतात. सुरुवात होते ती कस्टम ड्युटीने. भारत सरकारला आयफोनच्या एकून किंमतीवर 11.43 टक्के इतकी इम्पोर्ट ड्युटी द्यावी लागते. ही इम्पोर्ट ड्युटी आयफोनची किंमत + शिपिंग आणि हँडलिंग चार्जेसवर आकारण्यात येते. यामुळे अनेक गोष्टींची किंमत भारतात आल्यांनतर वाढते.

IPhone in india अॅक्सेसरिज इम्पोर्ट ड्युटी : जरी आयफोनला इम्पोर्ट ड्युटी दिलेली असली तरी त्यासोबतच्या अॅक्सेसरिज त्या ड्युटी कोड मध्ये येत नाहीत म्हणून चार्जर्स, हेडफोन्स आणि इतर ज्या काही अॅक्सेसरिज आयफोन सोबत येतात त्यांवर प्रत्येकी वेगळी इम्पोर्ट ड्युटी आकारली जाते.

IPhone in india VAT : इम्पोर्ट ड्युटी भारत सरकारने स्वीकारल्यानंतर आयफोनवर वेगवेगळ्या राज्यानुसार VAT आकाराला जातो. प्रत्येक राज्याचा विचार करता स्मार्टफोन वर सरासरी किमान 12.5% VAT आकारला जातो.

हेही वाचा : अमेरिकन शेतकरी भारतीय शेतकऱ्यांपेक्षा का पुढे आहेत, जाणून घ्या कारण

IPhone in india स्टेट गव्हर्मेन्ट टॅक्सेस : काही राज्यांमध्ये ऑक्ट्राइ आणि एज्यूकेशनल सीजचा अतिरक्त भार आयफोनवर पडतो. यामुळे प्रत्येक राज्यात आयफोनची किंमत वेगवेगळी दिसून येते.

IPhone in india भारतीय रुपयामधली घट : गेल्या काही दिवसापासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सातत्याने कोसळत आहे. आयफोनची डॉलर मधील किंमत भारतात रुपयामध्ये रुपांतरीत होते आणि म्हणूनच आपल्या रुपयाची कमी किंमत आयफोनच्या महाग किंमतीस कारणीभूत ठरते.

IPhone in india यासर्व करांमुळे व इतर कारणांमुळे आयफोन हा भारतात महाग आहे. जर आयफोन भारतात स्वस्त हवा असेल तर आयफोनची निर्मिती भारतात झाली पाहिजे. विशेष म्हणजे भारत सरकारने याला परवानगी दिली असून लवकरच आयफोनची निर्मिती भारतात होऊ शकते व सर्वसामान्य भारतीयांचं आयफोनचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues