Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot : तुम्ही पुन्हा अन्न गरम करून ‘या’ आजारांना देताय आमंत्रण…

0

Krushidoot आपण अन्नपदार्थ साठवून ठेवतो. उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेऊन दुसर्‍या दिवशी गरम करून खातो. पण काही पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्याद्वारे विषारी घटकांची निर्मिती होते. कोणते पदार्थ ठरू शकतात विषारी? त्याबद्दल जाणून घेऊयात…

Krushidoot पुन्हा गरम केल्याने बटाट्यांमधली सगळी पोषणमूल्यं नाहीशी होतात. बराच काळ बाहेर ठेवल्यानंतरही बटाट्यांमध्ये विषारी घटकांची निर्मिती व्हायला सुरूवात होते. शिळे बटाटे खाल्याने उलटी, मळमळ किंवा फूड पॉयझनिंग होऊ शकते.

Krushidoot तुम्ही तांदूळ कसा साठवून ठेवता यावर बरंच काही अवलंबून असते. तांदळातल्या काही घटकांमुळे बॅक्टेरियाची निर्मिती होते. तांदूळ शिजवल्यानंतरही हे बॅक्टेरिया जिवंत राहू शकतात. शिजवलेला भात बाहेर ठेवल्यावर बॅक्टेरियामध्ये वाढ होऊन विषारी घटकांची निर्मिती होते. शिळा भात खाल्ल्यानंतर डायरिया, उलटीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रथिनांचा मुख्य स्त्रोत असलेली अंडी एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम करू नयेत. पुन्हा गरम केल्याने अंड्यांमध्ये विषारी घटकांची निर्मिती होऊन पचनसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : कोंडा काही मिनिटांत होईल गायब, नक्की वाचा रामबाण उपाय

Krushidoot मशरूम्सप्रमाणे चिकनमध्येही प्रथिनांचे प्रमाण बरंच जास्त असते. त्यामुळे चिकन पुन्हा गरम करून खाऊ नये. यामुळे पचनासंबंधीच्या तक्रारी उद्भवू शकतात. उरलेले चिकन गरम करून खायचे असेल तर थोडं कमी गरम करून खाऊ शकता.

लोह आणि नायट्रेटस् या घटकांनी समृद्ध असेलला पालक पुन्हा गरम करू नये. पालकातल्या नायट्रेटसचे रूपांतर विषारी घटकांमध्ये होते.

द्राक्षाच्या बिया, अक्रोड, अ‍ॅव्हाकॅडो तसेच जवसाच्या तेलाचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू नये. त्याऐवजी सॅलड किंवा जेवणात तेल वरून घालता येईल.

मशरूम्समध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे शिळं मशरूम खाऊ नये. शिजवलेले मशरूम त्याच दिवशी संपवायला हवे. पुन्हा गरम केल्याने मशरूम्सच्या संरचनेत बरेच बदल होतात. पुन्हा गरम केलेले मशरूम खाल्ल्याने पचनासंबंधी तसेच हृदयासंबंधीच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews