Take a fresh look at your lifestyle.

दररोज सात रूपये गुंतवा; पाच हजार रूपये पेन्शन मिळवा…!

0

सामान्य लोकांसाठी केंद्र सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. मात्र यापैकी कामगारांसाठी आणलेली अटल पेन्शन योजना लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आज त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

अटल पेन्शन योजनेंतर्गत 60 वर्ष वयानंतर नागरीकांना पेन्शनच्या रूपात 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 रूपये मिळणार आहेत. या योजनेमध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले 18 ते 40 वर्ष वयाचे कोणतेही नागरीक सहभागी होऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना 2015 रोजी सुरू केली होती. या योजनेंतर्गत चालू वर्षात तब्बल 28 लाखांहून अधिक APY खाती उघडण्यात आली आहेत. PFRDA कडे उपलब्ध आकडेवारीनुसार 78 टक्के लोकांनी 1,000 रूपये प्रति महिना योजनेची तर 14 टक्के लोकांनी 5,000 रूपये प्रति महिना पेन्शन योजनेची निवड केलीय.

या योजनेचा अधिक लाभ मिळवण्यासाठी लहान वयातच यात सामिल व्हायला हवे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झालात, तर तुम्हाला दररोज फक्त 7 रुपये जमा करून दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. दर महिन्याला 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. 2,000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3,000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनसाठी दर महिन्याला 168 रुपये जमा करावे लागतील.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues