Take a fresh look at your lifestyle.

राज्यात शेळीमार्फतची धवलक्रांती येणार; असे आहे सरकारचे नियोजन

0

महाराष्ट्र सरकारतर्फे शेळीच्या दुधाद्वारे पुन्हा एकदा धवलक्रांती आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात शेळीपालन व्यवसायाला भविष्यात अच्छे दिन येण्याची दाट शक्यता आहे.

एका बक्षीस वितरण कार्यक्रमात पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी माहिती देताना म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी शेळीपालन व्यवसायात आमूलाग्र बदल घडवण्यात येणार आहे. जास्त दूध देणाऱ्या सानेन शेळीला भारतात आणून त्यांची पैदास वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. याकरिता ऑक्टोबरमध्ये जागतिक स्तरावर निविदा काढली जाणार आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, मुंबईसारख्या शहरात शेळीच्या दुधाला मोठी मागणी आहे. कोरोनासारख्या आजारात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शेळीचे दूध महत्त्वपूर्ण आहे. याचमुळे शेळीपालन व्यवसायात भविष्यात मोठा बदल होणार आहे. राज्य सरकार शेळीपालनातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे. त्यासाठी प्रक्रिया, बाजारपेठ यावर भर असेल.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.