Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती? जाणून धक्का बसेल!

0

आपला भारत कृषीप्रधान देश असल्याचे आपण गर्वाने सांगतो. मात्र त्याच बळीराजाच्या समस्यांबद्दल कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने एक सर्व्हे केला. त्यातील आकडेवारी जाणून तुम्हला नक्कीच धक्का बसेल. कारण भारतातील एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास 50% शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात अडकले आहेतत.

सन 2019 मध्ये 50% कर्जदार हे शेतकरी कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. या कुटुंबावर 74.121 रुपयांचे कर्ज आहे. शेतकऱ्यांवर असलेल्या एकूण कर्जापैकी 69.6% कर्ज हे बँक, सहकारी संस्था आणि सरकारी एजन्सी सारख्या संस्थात्मक स्त्रोतांपासून घेतले गेलेय. तर 20.5% कर्ज हे खासगी सावकारांकडून घेतले गेले आहे. शेतकऱ्याने घेतलेले 57.5% कर्ज हे शेतीशी संबंधित उद्देशाने काढले गेले आहे.

एनएसओने जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान, देशातील ग्रामीण भागातील कुटुंबांचे जमीन आणि पशुधन यांच्याशिवाय शेतकरी कुटुंबांच्या एकूण स्थितीचाही अभ्यास केला होता. या सर्व्हेसार कृषी वर्ष 2018-2019 (जुलै ते जून) दरम्यान प्रति शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न अवघे 10,582 रुपये इतके होते.

शेतकरी कुटुंबाचे मासिक उत्पन्न (जुलै 2018 ते जून 2019 दरम्यान) किती?

● शेतकरी कुटुंब : 10,582 रुपये
● मजूरी करणारे कुटुंब : 4,063 रुपये
● पीक : 3,798 रुपये
● पशुपालन : 1582
● बिगर-कृषी व्यवसाय : 641 रुपये
● जमीन भाडे : 134 रुपये

एनएसओने दिलेल्या माहितीनुसार देशातील शेतकरी कुटुंबांची संख्या 9.3 कोटी आहे. यात मागासवर्गीय (ओबीसी) 45.8%, अनुसूचित जाती 15.9%, अनुसूचित जनजाजाती 14.2% आणि अन्य 24.1 % आहेत. सर्व्हेनुसार, गावात राहणाऱ्या बिगर शेतकरी कुटुंबांची संख्या 7.93 कोटी इतकी अपेक्षित आहे. यावरुन समोर येते की 83.5% ग्रामीण कुटुंबांकडे एक हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues