Take a fresh look at your lifestyle.

Yoga to Stop Hair Fall | केस गळती रोखण्यासाठी ‘ही’ योगासने आहेत फायदेशीर; वाचा सविस्तर

0

Hair Fall | सध्याचे जग वेगाने बदलत आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनशैलीवर होत आहे. विकसित होण्यासाठीच्या शर्यतीमध्ये पुढे जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये व्यस्त झाल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रवाहासोबत जात असताना स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष न दिल्यामुळे आजकाल अनेक आजार बळावत आहेत. यात मानसिक आजारांचे प्रमाण जास्त आहे. ताणतणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार अशा समस्यांनी पीडित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सभोवतालच्या बदलांचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. यामुळे केस गळती सारख्या गंभीर समस्या वाढल्या आहेत.

Thyroid Treatment : थायरॉईडचे प्रकार आणि तो पूर्णपणे बरा होण्यासाठी काय उपाय आहेत?

केस गळण्यामागील प्रमुख कारणे (Causes Of Hair Fall)

सर्वसाधारणपणे दरदिवशी 100-150 केस आपोआप गळत असतात. त्यांच्या जागी नवे केस उगवतात. पण जेव्हा खूप केस गळतात आणि गळालेल्या केसांच्या जागी नवे केस उगवत नाही, तेव्हा स्थिती हाताबाहेर जायला लागते. केस गळती होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. या आर्टिकलमध्ये या घटकांविषयीची माहिती मिळेल.

॰ अनुवांशिक ट्रेंड्स

॰ हार्मोनल डिसऑर्डर

॰ चुकीचा डाएट प्लॅन

॰ आजार, व्याधी

॰ गोळ्या किंवा औषधे

॰ हेअर डाय

॰ डँड्रफ (केसांत कोंडा होणे)

॰ धुम्रपान करायची सवय

या कारणांमुळे केस गळतीची समस्या वाढते. या कारणांव्यतिरिक्त ताणतणाव, चिंता हे मानसिक घटक केस गळतीची समस्या वाढण्यासाठी कारणीभूत असतात. जर हे मानसिक घटक नाहीसे झाले, तर केस गळायचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. ताणतणाव, चिंता, नैराश्य अशा मानसिक अवस्थेमधून बाहेर पडण्यासाठी योगा, प्राणायाम आणि संतुलित आहार या गोष्टींची मदत घेता येते. योगाभ्यासामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाते. रक्त प्रवाह शरीराच्या प्रत्येक भागात पोहचल्यामुळे आरोग्य सुधारते. योगा केल्यामुळे मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन हे घटक पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात पोहचतात. डोक्यामध्ये ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणामध्ये असल्यास केस गळतीच्या प्रक्रियाचा वेग मंदावतो.

मत्स्यासन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे आणि करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात

केस गळती थांबवण्यासाठी काय करावे ? (How To Stop Hair Fall?)

योगशास्त्रातील काही आसनांमध्ये डोक्याचा भाग समोरच्या दिशेला वाकवावा लागतो. शीर्षासन सारख्या योगासनांचा सराव करताना शीर (डोक्याचा भाग) खाली आणि बाकीचे शरीर वर हवेत असते. अशा काही आसनांमुळे डोक्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त रक्तपुरवठा झाल्यामुळे केसांना फायदा होतो. या आर्टिकलमध्ये नमूद केलेल्या आसनांचा नियमितपणे सराव करुन तुम्ही केस गळतीचे प्रमाण कमी करायचे ध्येय पूर्ण करु शकाल.

केस गळती रोखण्यासाठी उपयुक्त असलेले योगासनांचे प्रकार (Yoga To Stop Hair Loss)

01. अधोमुख शवासन (Adho Mukha Savasana)

yoga-to-stop-hair-loss- 02


अधोमुख शवासन या आसनाच्या सरावामुळे मेंदूपर्यंत मुबलक प्रमाणात रक्त पुरवठा होतो. या आसनामुळे सायनोसायटिस हा आजार बरा होण्यासाठी मदत होते. वातावरणातील गारवा वाढल्यामुळे होणारे सर्दी-पडसे यांसारखे आजार या आसनामुळे बरे होतात. अधोमुख शवासन केल्यामुळे मानसिक ताणतणाव, निद्रानाश आणि नैराश्य अशा गोष्टींवर मात करता येते.

शरीर लवचिक आणि चपळ घडवण्यासाठी ही 7 योगासने करा

02. उत्तानासन (Utthanasana)

yoga-to-stop-hair-loss- 03

उत्तानासनामुळे थकवा नाहीसा होतो. सुस्ती आल्यास या आसनाचा सराव करावा. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने डोक्यातील रक्तपुरवठ्याचे प्रमाण वाढते. त्यासोबत मेंदूमधील ऑक्सिजन लेवल देखील वाढते. रक्त आणि ऑक्सिजन डोक्यापर्यंत पोहचल्यामुळे केस गळतीची समस्या रोखण्यास मदत होते.

03. पवनमुक्तासन (Pavanmukthasana)

yoga-to-stop-hair-loss- 04


केस गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी पवनमुक्तासन या आसनाची मदत करते. त्याचसोबत या आसनामुळे पोटातील अनावश्यक गॅस बाहेर निघते. पवनमुक्तासनाचा अभ्यास केल्यामुळे अपचनाची समस्या नाहीशी होते. बद्धकोष्ठता (Constipation) या आजाराने पीडित असलेल्या रुग्णांनी पवनमुक्तासनाचा सराव करावा.

04. सर्वांगासन (Sarvangasana)

yoga-to-stop-hair-loss- 05

शरीराच्या प्रत्येक अंगाला (अवयवाला) फायदा होत असल्यामुळे या आसनाला सर्वांगासन हे नाव पडले. सर्वांगासनाचा नियमितपणे अभ्यास केल्यास थायराॅइड ग्रंथींना पोषण मिळते. या आसनामुळे श्वसनक्रिया, पचनक्रिया, मज्जासंस्था आणि मूत्रविसर्जन क्रिया यांच्याशी संबंधित समस्या दूर होतात. सर्वांगासनामुळे मेंदूमधील रक्ताचे प्रमाण वाढते.

05. वज्रासन (Vajrasana)

yoga-to-stop-hair-loss- 05

वज्रासन या आसनाला डायमंड पोझ असेही म्हटले जाते. इतर आसनांचा सराव उपाशीपोटी करणे योग्य असते. वज्रासनाचा अभ्यास जेवल्यानंतर लगेच करता येतो. या आसनाच्या अभ्यासामुळे मूत्रविसर्जन प्रक्रियेशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी मदत होते. वजन कमी करणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी वज्रासन फायदेशीर असते. पोटामध्ये अनावश्यक गॅस जमा झाल्यास हे आसनाचा सराव करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues