Take a fresh look at your lifestyle.

Second Hand Mobile : सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करतांना घ्या ‘ही’ काळजी (Krushidoot Tips)

0

Second Hand Mobile नवीन मोबाईलच्या किंमती आवाक्याबाहेर जात असल्या तरी काहींना नवीन मोबाईल खरेदीचे वेड असतेच. त्यामुळे जुना मोबाईल विकून बाजारातील नवीन मोबाईल खरेदीसाठी ते उत्साही असतात. अर्थात सर्वचजण नवीन मोबाईल खरेदी करु शकत नाहीत. त्यामुळे जुना पण चांगला स्मार्टफोन असेल तर खरेदी करुन स्मार्टफोनची गरज भागवतात. परंतू प्रत्येकवेळी सेकंडहॅण्ड फोन चांगला असेलच याची खात्री देता येत नाही. त्याची वैधता, तांत्रिकता आणि उपयोगिता पडताळूनच खरेदीचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच त्याबद्दल जाणून घेऊयात…

Second Hand Mobile बिल आणि बॉक्सचा आग्रह : सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करतांना आपण बिलचा आग्रह करायला हवा. कारण यामुळे विक्री होणारा मोबाईल हा चोरीचा तर नाही ना याची खातरजमा होऊ शकते. जर भविष्यात आपल्याला तो मोबाईल विकायचा असेल तर हे बिल आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्याचबरोबर फोन बरोबर बॉक्स घेतल्याने आपण आयएमईआय क्रमांक देखील व्हेरिफाय करु शकतो. जर विक्रेता आपल्याला मोबाईलची अ‍ॅक्सेसरीज् देत नसेल तर आपण मोबाईलची किंमत आणखी कमी करु शकतो.

हेही वाचा : नाद खुळा! दूध व्यवसायातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला दीड कोटींचा नफा..

Second Hand Mobile 2 जीबी रॅम RAM : दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोनमध्ये आता 2 जीबी रॅम ही बाब सामान्य झाली आहे. त्यासाठी सेकंड हॅण्ड स्मार्टफोन खरेदी करतांना किमान 2 जीबी रॅम असावी, याची पडताळणी करुन घ्यावी. त्याचबरोबर त्याचा प्रोसेसरही तपासून घ्यायला हवा. एक वर्ष जुने असलेल्या मिडीयाटेक प्रोसेसर असणारे स्मार्टफोनची कामगिरी चांगली राहत नाही. क्वॉलकॉम स्नॅपड्रगन चिपचे स्मार्टफोन चांगले असतात, हे लक्षात घ्या.

Second Hand Mobile आयएमईआय नंबर IMEI Number तपासा : अनेकदा बरीच मंडळी चोरीचा स्मार्टफोन विकतात. जर आपल्याला याबाबत शंका आली तर बिल आणि बॉक्सची शक्यता कमीच असते. बॉक्समध्ये असलेल्या आयएमईआय नंबरला आपण स्मार्टफोनवर *#06# डायल करुन दाखवणार्‍या क्रमांकाशी मिळताजुळता असायला हवा. जर हे क्रमांक जुळले नाही तर काहीतरी गडबड आहे. हे समजून घ्यायला हवे. IMEI detective.com सारख्या संकेतस्थळावर नंबर टाकावा जेणेकरुन एखाद्याचा फोन चोरीस गेला असेल तर त्याच्या तपासासाठी त्याने या क्रमांकाचा वापर केला आहे कि नाही, हे समजणे सोपे जाईल.

हार्डवेअरवर तपासा : स्मार्टफोनची बॉडी काळजीपूर्वक तपासली पाहिजे. बॉडी क्रॅक तर झालेली नाही ना हे पाहणे महत्वाचे ठरते. त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि युएसबी केबल सोबत घेऊन जा. सेकंडहॅण्ड मोबाईल योग्य रितीने चार्ज होतो कि नाही हे तपासून पहा. आपले सिमकार्ड टाकून नेटवर्कला काही अडचण आहे का? याचीही चाचपणी होऊ शकते. इंटरनेट ऑन करुन काही अ‍ॅप्सदेखील इन्स्टॉल होतात कि नाही, हे पाहणे आवश्यक आहे.

वॉरंटी तपासणी Warranty Check : जुना स्मार्टफोन खरेदी करतांना त्याच्या वॉरंटीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. जर वॉरंटीच्या काळात खरेदी असेल तर आपल्यासाठी ते फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे मोबाईलची कागदपत्रे तपासून पाहिली पाहिजेत. जर सेकंडहॅण्ड मोबाईल घेतल्यावर आपल्याला तांत्रिक अडचणी आल्या आणि तो वॉरंटी काळातील असेल तर अधिकृत सर्व्हिस सेंटरवर दुरूस्त करणे किंवा बदलून घेणे सोयीचे ठरते. त्यामुळे मोबाईच्या वॉरंटी-गॅरंटीचा काळ तपासून पहावा. मॅन्यूफॅक्चर तारिखही तपासून पहावी, म्हणजे मोबाईल किती जुना आहे हे कळते. काही मंडळी मोबाईलची बॉडी बदलून विक्री करण्याचा प्रयत्न करतात. अशा फसव्या विक्रेत्यांपासून सावध रहावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues