Take a fresh look at your lifestyle.

fitness : जिमला जाताय? मग वाचा या खास टिप्स…

0

बॉडीची आवड कोणाला नसते. जबरदस्त बॉडीसाठी व्यायाम करणे व जिमला जाणे आवश्यक असते. अनेक जण जिमला जातात व्यायामही करतात. पण जिममध्ये व्यायाम करताना काही तांत्रिक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. अन्यथा त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे जिमला गेल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी त्यावर एक नजर टाकुयात…

जीमला जाण्यापूर्वी एखाद फळ किंवा हलका आहार घ्या. रिकाम्या पोटी जिमला गेल्यास अशक्तपणा येण्याची शक्यता असते.

वजन वाढण्याच्या भीतीने अनेकजण नो कार्ब डाएट घेतात. आहारात कर्बोदकांचा समावेश न केल्यास अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

बदाम, अक्रोडसारखे पदार्थ खा. हे पदार्थ न खाल्ल्यास डिप्रेशन, रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्यासारख्या समस्या होतात.

जीममध्ये गेल्यावर आधी काही वेळ वॉर्म अप व स्ट्रेचिंग करा. वॉर्म अप न करता व्यायाम सुरू केला तर पाठ आणि अंगदुखी होण्याची शक्यता असते.

जीममध्ये तुम्ही जे साहित्य वापरणार आहात ते साहित्य पहिले तुमच्या रचनेप्रमाणे अँडजस्ट करून घ्या.

हेही वाचा : तुम्ही पुन्हा अन्न गरम करून ‘या’ आजारांना देताय आमंत्रण…

जास्त प्रोटिन्समुळे शरीरावर विपरित परिणाम होत असतात. म्हणून जिमला जाताय म्हणून जास्त प्रोटिन्स घेऊ नका.

व्यायामानंतर खूप घाम आल्याने शरीरातलं पाणी कमी होत असतं म्हणून जीमनंतर लगेच कॉफी पिऊ नका.

व्यायामानंतर किमान पंधरा मिनिटे पाणी पिऊ नका. पण त्यानंतरही पाणी पिला नाहीत तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues