Take a fresh look at your lifestyle.

फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये हा संघ दाखल; पहिल्या सामन्यात पराभव, तर त्यानंतर थेट फायनल मध्ये एन्ट्री, वाचा संपूर्ण कहाणी

0

काल झालेल्या सामन्यात सर्व चाहत्यांच्या नजरा अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सी आणि क्रोएशियाचा कॅप्टन लुका मॉड्रिच यांच्यावर होता. दोघांचाही हा शेवटचा वर्ल्डकप आहे. दोघांनीही आतापर्यंत एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही. या दोन्ही महान खेळाडूंवर आपापल्या संघाला फायनलमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी होती. परंतु सेमीफायनलच्या या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनानं (Argentina) क्रोएशियाचा (Croatia) पराभव करत फायनल्समध्ये धडक मारली. अर्जेंटिनाच्या विजयाचं संपूर्ण श्रेय कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ज्युलियन अल्वारेज यांना जाते. त्यांच्या जादुई कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले आहे.

अर्जेंटिना व क्रोएशिया या दोनीही संघांसाठी सेमीफाइनलचा हा सामना अत्यंत महत्वाचा होता. परंतु संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियाला एकही गोल करू दिला नाही. तर मेस्सीनं एक गोल, तर अल्वारेजनं दोन गोल करत अर्जेंटिनाला फायनल्समध्ये प्रवेश मिळवून दिला.कितव्या मिनिटाला कोणी केला गोल पाहा..

पहिला गोल : 34व्या मिनटाला अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीनं पेनल्टीवर गोल केला
दुसरा गोल : 39व्या मिनटाला अर्जेंटिनासाठी ज्युलियन अल्वारेजनं गोल केला
तिसरा गोल: 69व्या मिनटाला अल्वारेजनं कर्णधार मेस्सीच्या पासवर दुसरा गोल केला

अशी झाली होती अर्जेंटिनाची सुरुवात :-

या विश्वचषकात अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला होता. या सामन्यात अर्जेंटिनाचा 1 – 2 नं पराभव झाला होता. त्यानंतर अनेक चाहत्यांना वाटत होते कि अर्जेंटिनासाठी फायनलसाठी चा प्रवास कठीण असेल परंतु मेस्सीच्या संपूर्ण टीमने अखेर करून दाखवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues