Take a fresh look at your lifestyle.

FIFA World Cup : फुटबॉल विश्वचषकात मोठा ‘दे धक्का’, इंग्लंड-पोर्तुगाल बाहेर

0

FIFA World Cup फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये मोठे उलटफेर पाहायला मिळत आहे. अगोदर ब्राझील आणि शनिवारी रात्री झालेल्या सामन्यांत इंग्लंड आणि पोर्तुगालसारखे दिग्गज संघ बाहेर पडले आहेत. तर दुसरीकडे इंग्लंड आणि मोरोक्कोने उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

FIFA World Cup पहिल्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने इंग्लंडवर 2-1 च्या फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला आहे. हे दोन्ही बलाढ्य संघ 40 वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आमने-सामने आले होते. दरम्यान 78 व्या मिनिटाला फ्रान्सने केलेला गोल आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने ऐनवेळी चुकवलेली पेनल्टीच्या संधीमुळे इंग्लंडचा स्पर्धेतून गाशा कुंडाळावा लागला.

FIFA World Cup सामन्यातील 18 व्या मिनिटालाच ऑरेलियन टिचोयुमेनीने फ्रान्सला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने 1-1 ची बरोबरी केली. कर्णधार हॅरी केनने पेनल्टीचं रुपांतर गोलमध्ये करत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र 78 व्या मिनिटाला पुन्हा फ्रान्सने घेतलेली हीच आघाडी निर्णायक ठरली.

महत्वाच्या बातम्या : IND Vs BAN ODI : ईशान किशनची वादळी खेळी, विस्फोटक फलंदाजी करत तोडले अनेक रेकॉर्ड

FIFA World Cup सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना इंग्लंडला पेनल्टी मिळाली. मात्र हॅरी केनला त्याचं रुपांतर गोलमध्ये करता आलं नाही. केनकडून गोल करण्याची ही हुकलेली संधी फ्रान्सला बाहेरचा रस्ता दाखवणारी ठरली.

FIFA World Cup आणखी एका उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. यासह उपांत्य फेरी गाठणारा हा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. यापूर्वी कोणताही आफ्रिकन देश फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला नव्हता. मात्र या पराभवासह पोर्तुगाल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोची मोहीम येथेच संपुष्टात आली. या सामन्यातील पहिला गोल युसूफ एन नेसरीने 42व्या मिनिटाला केला. यासाठी त्याला अतियात-अल्लाह यांनी मदत केली. या गोलच्या जोरावर मोरोक्कोने सामना जिंकला.

हाफ टाईमला मोरोक्कोने पोर्तुगालवर 1-0 अशी आघाडी घेत इतिहास रचला. एन नेसरीने 42व्या मिनिटाला हेडर मारून संघाला चांगली सुरुवात करून दिली. आता सामन्यात पुनरागमन करण्यासाठी पोर्तुगालला बरोबरी साधावी लागणार होती. दरम्यान हाफटाइमपर्यंत पोर्तुगालने पाच शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला. यापैकी एकच टार्गेट होता. तर, मोरोक्कोने सात शॉट्सचा प्रयत्न केला. यापैकी दोन जण टार्गेटवर होते. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या बाबतीत पोर्तुगीज संघ पुढे राहिला. पोर्तुगालचा चेंडूवर ताबा 66 टक्के आणि मोरोक्कोचा 34 टक्के होता. विशेष बाब म्हणजे पोर्तुगाल संघाने ख्रिस्तियानो रोनाल्डोला सुरुवातीच्या फळीत स्थान दिलेले नाही. मोरोक्को विरुद्ध पोर्तुगालच्या सुरुवातीच्या फळीचे सरासरी वय 26 वर्षे 332 दिवस आहे, जे विश्वचषकात मैदानात उतरलेले त्यांचे सर्वात तरुण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues