Take a fresh look at your lifestyle.

IND vs BAN ODI : ईशान किशनची वादळी खेळी, विस्फोटक फलंदाजी करत तोडले अनेक रेकॉर्ड

0

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा फलंदाज व आजच्या सामन्याचा भारताचा सलामीवीर Ishan Kishan ईशान किशननं अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत एक अनोखा इतिहास रचला. या खेळी मध्ये ईशानने इशान किशनने 85 चेंडूत शतक केलं. यात त्याने 14 चौकार आणि दोन षटकार लगावले होते. त्यानतंर पुढच्या 41 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांसह 100 धावा पूर्ण करत आपले द्विशतक केलं.

या सामन्यात मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ओळख असणाऱ्या भारताच्या सलामीवीराने खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, कमी वयात अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा क्रमांकाचा खेळाडू बनला. या यादीत सचिन तेंडूलकर Sachin Tendulkar, वीरेंद्र सेहवाग Virendra sehwagh , रोहित शर्मा Rohit Sharma आणि आता ईशान ने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ईशानने हे विक्रम केले आपल्या नावावर :

▪️ किशन हा बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा युवा भारतीय सलामीवीर ठरला. त्याने हे अर्धशतक 24 वर्षे आणि 145 दिवसांच्या वयात ठोकले.
▪️ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. त्यानं 2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 138 चेंडूत 200 धावांचा शिखर गाठला होता.

दरम्यान, या सामन्यामध्ये टीम इंडियाने बांगलादेशसमोर ईशान किशनच्या 210 व विराट कोहलीच्या 113 धावांच्या मदतीने 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. एवढेच नव्हे तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या आजच्या शतकामुळे अखेर त्याच्या शतकाचा दुष्काळ संपला आहे. विराटनं ऑगस्ट 2019 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचं शतक ठोकलं होतं. त्यानंतर तब्बल 1 हजार 214 दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालंय.

कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues