Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot News : अखेर पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी!

0

Krushidoot News राज्य सरकारने एमपीएससीमध्ये पोलीस भरतीत तृतीय पंथीयांसाठी (Transgender) स्वतंत्र पर्याय ठेवण्याची तयारी दाखवली आहे. अडीच महिन्यांत तृतीयपंथीयांच्या शारीरिक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवण्याचे निर्देश देखील कोर्टाने राज्य सरकारला दिलेत. यानुसार आता स्री, पुरुष नंतर तिसरा पर्याय देखील उपलब्ध होईल. त्यामुळे तृतीय पंथी देखील लवकरच शासकीय नोकऱ्यांमध्ये येणार आहेत.

Krushidoot News एवढंच नाही तर तृतीय पंथीयांची निवड करायची असेल तर अडीच महिन्यांत तृतीय पंथीयांच्या शारिरीक चाचणीसाठी स्वतंत्र नियमावली बनवा, असे निर्देश हायकोर्टाने Mumbai HighCourt  दिले आहेत. त्याचबरोबर तृतीय पंथीयांची शारिरीक चाचणी ही 28 फेब्रुवारीनंतर नव्या नियमावलीनुसार सांगण्यात आले आहे.

एमपीएससीसाठी अर्ज करण्याची मुदत ही 15 डिसेंबरपर्यंत असल्याने 13 डिसेंबरपर्यंत वेबसाईटवर तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे.

काही तृतीय पंथीयांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधीकरणमध्ये याचिका दाखल करत एमपीएससी परिक्षेचा अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र फॉर्म भरण्यासाठी गेले असता वेबसाईटवर दोनच पर्याय उपलब्ध होते. तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊन देखील राज्य सरकारने तरतूद का केली नाही? यासाठी ही याचिका होती. या पार्श्वभूमीवर ही याचिका ग्राह्य धरत कोर्टाने पुढील निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या : महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ कायद्याची कोणती योजना आहे की नाही? फडणवीसांनी दिले उत्तर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues