Take a fresh look at your lifestyle.

Himchal Delhi Election : हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत मोदी मंत्र का चालला नाही? यावर बोला ना…

0

Himchal Delhi Election भाजपने हिमाचल प्रदेश व दिल्लीची महानगरपालिका देखील गमावली. तर हिमाचलमध्ये कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र दोन राज्यांत मोदी मंत्र का चालला नाही? उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील पोटनिवडणुकांतही विरोधकांना चांगले यश मिळाले. पण तरीही चर्चा फक्त गुजरातचीच. गुजरात जिंकणारच होते. हिमाचल, दिल्लीत लोकांनी का नाकारले, यावरही चर्चा होऊ द्या, असं आवाहन शिवसेनेने केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून यावर भाष्य करण्यात आले आहे.

Himchal Delhi Election सामनातून भाजप आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यात म्हटले की, राजकारण एक खेळ आहे. चलाख लोक हा खेळ खेळतात. मूर्ख लोक त्यावर दिवसभर चर्चा करतात. सध्या आपल्या देशात यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? मोदींनी गुजरात जिंकले. या विजयावरच आता चर्चा सुरू आहे. भारतवर्ष एकत्र राहावे म्हणून ‘भारत जोडो’ यात्रेवर राहुल गांधी आहेत. त्याच वेळी देशातील दोन राज्यांच्या विधानसभा व दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. गुजरात सोडले तर दोन ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपने गुजरात जिंकले त्यात नवल ते काय? मोदींचे गुजरात दुसरे कोण जिंकणार? गुजरातमधील प्रत्येक प्रचारसभेत नरेंद्र मोदी सांगत होते, ‘‘हे गुजरात माझे आहे. हे गुजरात मी बनवले आहे,’’ अशी भावनिक साद व काँग्रेसचे संघटनात्मक फोलपण यामुळे गुजरातवर भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला.

Himchal Delhi Election भाजपच्या इतर राज्यातील पराभवांवर चर्चा व्हायला हवी, अशी साद देखील सामनातून घालण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने जे गमावले त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. भाजपने राजधानी दिल्लीतील 15 वर्षांची सत्ता गमावली. दिल्ली महानगरपालिकेत भाजप पराभूत झाली. देशाच्या राजधानीतला हा पराभव. त्याच वेळी भाजपची सत्ता असलेले हिमाचल प्रदेश गमावले. काँग्रेसने येथे पूर्ण बहुमत मिळवून भाजपची सत्ता खेचून घेतली. म्हणजे तीन सामन्यांत भाजप फक्त एके ठिकाणी, गुजरातमध्येच जिंकला. अन्य दोन ठिकाणी ते पराभूत झाले. मोदी-शहांची जादू आपल्या गृहराज्यात चालली, पण प्रत्यक्ष दिल्लीत व हिमाचल प्रदेशात चालली नाही. याआधी ती पंजाबमध्येही अजिबात चालली नाही, पण भाजप फक्त विजयाचा उत्सव साजरा करतो. त्या उत्सवात पराभवाची चर्चा करणे लोक विसरतात. हा मूर्खपणाच आहे, असंही शिवसेनेने म्हटले आहे

Himchal Delhi Election मोदींनी गुजरात जिंकले, केजरीवाल यांनी दिल्ली आणि काँग्रेसने हिमाचल जिंकले! सामना बरोबरीत सुटला, असंही सामनातून म्हटलं गेलं. भाजपच्या उद्याच्या राजकारणाचे चित्र या तीन निर्णयांनी स्पष्ट झाले आहे. त्याचा विचार आपण सर्वांनीच करावयास हवा. गुजरात हा अपवाद आहे. पण काँग्रेस जिवंत आहे व अनेक राज्यांतील मतदार काँग्रेसकडे पर्याय म्हणून पाहतात हे हिमाचलसारख्या राज्यात दिसून आले. दिल्लीच्या मनपा निवडणुका भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली. तरीही ‘आप’ने तेथे 134 जागा जिंकून भाजपवर झाडू फिरवला. येथे काँग्रेस नावालाही उरली नाही. पण काँग्रेस व आप एकत्र आले असते तर आप व काँग्रेसने मिळून दोनशे जागा जिंकल्या असत्या. दिल्लीत एकेकाळी काँग्रेसचा जोर होता व शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिंकत होती. आज काँग्रेसकडे दिल्लीत नेता नाही. आश्चर्य असे की, जे ‘मोदी-शहा’ देश जिंकण्यासाठी चाणक्य नीती अवलंबतात ते प्रत्यक्ष दिल्लीची विधानसभा व महानगरपालिका जिंकू शकले नाहीत. प्रियंका, राहुल, सोनिया गांधी दिल्लीत असूनही तेथील महानगरपालिकेत 15 जागा काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत.

हेही वाचा : दिल्लीत ‘आप’च बाप, भाजप आणि काँग्रेस साफ; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

गुजरातमध्ये भाजपच्या विजयाचा मोदी मंत्र काय होता? सविस्तर वाचा!

Himchal Delhi Election गुजरातच्या विजयला महाराष्ट्राची साथ आहे, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे. गुजरातमध्ये भाजपने 156 जागा जिंकल्या. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. गुजरातमध्ये मतदान हे सरळ सरळ हिंदू विरुद्ध मुसलमान असेच झाले. गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेतील भाषणे काळजीपूर्वक पाहिली तर गोध्रा प्रकरणात अप्रत्यक्षपणे काय केले यावरच त्यांचे विवेचन असे. 1992 च्या मुंबईतील दंगलीत शिवसेनेने हिंदू रक्षणासाठी जी भूमिका बजावली तीच भूमिका गुजरातेत बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने बजावली. श्री. मोदी हे तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, पण पुढे मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून मोदी यांनी गुजरातला आर्थिक व औद्योगिकदृष्टय़ा प्रबळ केले. मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र त्यांनी सरळ गुजरातेत नेले. डायमंड हबही नेले. अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून नेले व गुजरातची भरभराट केली.

मोदी हे पंतप्रधान म्हणून फक्त गुजरातचेच हित पाहत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली तरी ‘मी प्रथम गुजराती’ ही भूमिका त्यांनी सोडली नाही. गौतम अदानी यांच्यामागे ते ठामपणे उभे राहिले व त्यांना जगातील तिसऱया क्रमांकाचे सर्वात श्रीमंत बनवले. ते गौतम अदानी हे गुजराती तरुणांचे आज ‘हीरो’ आहेत व काँग्रेस अदानी यांच्या विरोधात मोहिमा राबवत राहिली. अदानी व मोदींवरील टीकेचा काहीही उपयोग आप आणि काँग्रेसला झाला नाही. मोदींमुळे भाजपला गुजरातमध्ये हरवणे कठीण आहे. याचा अर्थ इतर राज्यांत भाजप अजिंक्य आहे असा नाही. हिमाचल व दिल्लीने ते दाखवून दिले. सवाशे वर्षांच्या काँग्रेसला लोक मरू देत नाहीत. ती या किंवा त्या राज्यात जिवंत होत असते. पंजाबचे राज्य गेले, पण बाजूच्या हिमाचल प्रदेशात काँग्रेस जिवंत झाली. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेने ती अधिक ऊर्जावान होईल, असंही सामनातून म्हटलं गेलंय.

शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवून टाकू, अशी भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी केली. पण त्यांचे स्वतःचे राज्य ‘हिमाचल’ येथेच भाजपचा दारुण पराभव झाला. लोकांना गृहीत धरू नका, हा धडा महत्त्वाचा. गुजरातेत ‘आप’ने काँग्रेसची 13 टक्के मते खेचली. ‘आप’ला अवघ्या 5 जागा मिळाल्या. पण 13 टक्के मतांमुळे ‘आप’ आता राष्ट्रीय पक्ष होईल. यावरच ते लोक खूश. काँग्रेसचे पाय त्यामुळे कापले व भाजपचा मोठा विजय झाला. गुजरातेत काँग्रेस किमान पन्नास जागांचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण ‘आप’ने भाजपला मोठ्या विजयाची संधी दिली, असा आरोपही सामन्यातून करण्यात आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues