Take a fresh look at your lifestyle.

Chapati making : थंड झाल्यावरही तुमची चपाती राहील मऊ व लुसलुशीत; त्यासाठी घरच्याघरी वापरा या सोप्या टिप्स

0

चपाती हा आपल्या रोजच्या जेवणातला अविर्भाज्य पदार्थ आहे. बरेच जण आहेत ज्यांना उत्तम चपात्या बनवता येतात पण असेही काही जण आहेत ज्यांना चपाती बनवणं (Chapati making) म्हणजे एक मोठं चॅलेंज वाटतं. काही जणांच्या बाबतीत होत असं की, चपाती गोल लाटली जाते पण तीच चपाती काही वेळाने खायचं म्हटलं म्हणजे ती कडक होते. परंतु, परफेक्ट चपाती बनवण्यासाठी पीठ योग्य प्रमाणात बारीक असणं आणि ताजं असणं सर्वांत महत्त्वाचं आहे. यासाठी काही अश्या बेसिक गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही उत्तम चपाती बनवू शकता आणि ती चपाती जरी सकाळी बनवली असली तरी रात्रीपर्यंत ती तशीच मऊ आणि लुसलुशीत राहू शकते…. (Even after cooling, your chapati will remain soft and luscious; Use these simple tips at home for that)

जाणून घ्या कशा ठेवली जातात चपाती मऊ आणि लुसलुशीत

  • काही महत्वाच्या आणि बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण उत्तम पोळ्या बनवू शकतो आणि त्या फारवेळ ठेवल्या तरी मऊ आणि लुसलुशीतच राहतील. पोळ्या बनवताना पाणी आणि पिठाचं योग्य प्रमाण वापरलं पाहिजे. जर तुम्ही एक वाटी पीठ घेत असाल तर अर्धा वाटी पाण्यात ते पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घ्यावे. त्याचसोबत पिठात एक चिमूट मीठ घालायला विसरू नका. यामुळे चपातीला चव येते आणि ती मऊ राहते.
  • पीठ मळण्याआधी ते चाळणीने व्यवस्थित चाळून घ्या. यामुळे पीठ सैलसर होऊन चपात्या मऊ होऊ लागतात.
  • चपाती बनवण्यासाठी पीठ नेहमी मऊसर आणि सैलसर मळावे .असं केल्याने चपाती मऊसर राहते. याउलट पुऱ्या बनवायच्या असतील तर मात्र पीठ थोडं कडक मळावं लागत.
  • पीठ मळताना सर्वात आधी कोरडं पिठ घेऊन त्यात हाताने एक खड्डा करावा त्यात हळूहळू पाणी घालत मग पीठ घालत मळून घ्यावं. लक्षात ठेवा पाणी हळूहळू घाला एकदम पाणी घालू नका. नाहीत पीठ पातळ होईल चपट्या लाटण मुश्किल होऊन बसेल.
  • चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते.
  • तव्यावर चपाती टाकल्यावर हे लक्षात ठेवा ती गोळा होता काम नये नाहीतर चपाती कधीच फुगणार नाही.
  • चपाती नेहमी फास्ट गॅसवरच शिकवावी. मंद आचेवर पोळी भाजली तर ती मऊ होणार नाही. म्हणून चपाती भाजताना गॅस सोयीप्रमाणे फास्ट किंवा स्लो करावा.

दरम्यान, छान गोल व लुसलुशीत पोळ्या करणं हे फार अवघड काम नाही. अशा काही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं व नियमित प्रयत्न केले तर हे सहज जमू शकतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues