Take a fresh look at your lifestyle.

Corporate World Skills : कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणं आणि ती नोकरी टिकवणं सोपे नाही मित्रांनो, त्यासाठी तुमच्याकडे हे स्किल्स असणं आवश्यक आहेत…

0

कोरोना महामारीच्या कठीण काळात सर्व क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी असतानाही अनेकांना जॉब मिळू शकले नाहीत. तर काही जणांचे असलेले जॉब्सही गेलेत. मात्र या कठीण काळात असं एकच क्षेत्र होतं जे जोमात आणि उत्साहानं काम करत होतं, ते म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र… भारतात कोरोना महामारीच्या काळात कॉर्पोरेट क्षेत्रावर कमी परिणाम होण्याचं प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्रातील जवळजवळ सर्व कर्मचारी हे यावेळी घरून काम (Work from Home) करत होते. एवढेच नव्हे तर एका सर्व्हेनुसार 2019 नंतर या क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

जर तुम्हीही या क्षेत्रात काम करत असाल तर हे बातमी तुमच्या साठी महत्वाची.. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात घवघवीत यश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

कॉर्पोरेट क्षेत्रात कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे : कॉर्पोरेट क्षेत्रात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची कंपनी कुठलीही असो त्यासाठी तुमच्याकडे चांगले कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी किंवा क्लायंटशी कशाप्रकारे संवाद साधतात यावर तुमची प्रगती ठरते. म्हणूनच कम्युनिकेशन स्किल्स उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

तुमच्याकडे डिजिटल स्किल्स असणे आवश्यक : कोणाला आवडो किंवा न आवडो पण आता जग डिजिटल क्षेत्राकडे वळलं आहे आणि डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन यासोबतच सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब हवाय किंवा यश मिळवायचंय तर तुमच्याकडे डिजिटल स्किल्स असणं आवश्यक आहे. येणारी नवीन टेक्नॉलॉजी शिकून समोर जाणं आवश्यक आहे.

प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आवश्यक : कंपनीसाठी मौल्यवान कर्मचारी म्हणून तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या किंवा सहकाऱ्यांच्या समस्या ओळखणे आणि त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. अनेक संस्था अशा कर्मचार्‍यांचा शोध घेतात जे समस्या ओळखू शकतात आणि त्या हुशारीने सोडवू शकतात. म्हणूच कर्मचाऱ्यांकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक असणं आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues