Take a fresh look at your lifestyle.

सतत सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन मुळे ट्रस्ट आहेत? करा ‘हे’ घरगुती उपाय

0

विशेषतः ऋतू बदलामुळे सर्दी, व्हायरल इन्फेक्शनसारख्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहेत. जर तुम्हालाही सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शनने ग्रासले असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत जे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील.

जर तुम्ही खोकल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबू आणि मध गुणकारी आहे. यासाठी एक ग्लास उकळत्या पाण्यात एक लिंबू आणि मध मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.

सर्दीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळस आणि आले चहामध्ये घालून वापरू शकता. याशिवाय तुम्ही या दोन्हीचे सेवन देखील करू शकता.

सर्दी आणि तापासून बचावासाठी औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची समस्याही दूर होते. यासाठी दोन चमचे हळद पावडर एक ग्लास दुधात मिसळून प्या. याशिवाय तुम्ही हळद पाण्यात उकळून गुळण्या करू शकता किंवा हळदीचे पाणी पिऊ शकता.

सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही काळी मिरी देखील वापरू शकता. काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. ती सकाळी गरम पाण्यासोबत काळी मिरी खाऊ शकता.

Disclaimer : वरील लेखात देण्यात आलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. त्याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.

हेही वाचा : हिवाळ्यात घसा खवखवणे, दुखणे यामुळे त्रस्त आहात? वाचा ‘या’ खास टिप्स

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues