Take a fresh look at your lifestyle.

तेलबियाणांच्या उत्पादनात वाढ होणार कि घट? जाणून घ्या!

0

यंदा सोयाबीन आणि सुर्यफूल दोन्ही पीकांमध्ये घट होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तेलबियांचे उत्पादन 233.90 लाख टन होण्याचा अंदाज आहे. खरिपातील पीकाचे पावसाने आणि रोगराईने नुकसान झाल्याने अशी परिस्थिती ओढावलेली आहे. गतवर्षीबाबत बोलायचे झाले तर तेलबियाणांचे उत्पादन हे 240. 30 लाख टन एवढे झाले होते.

खरिपात असणाऱ्या पिकावर तेलबियाणांचे उत्पादन अवलंबून असते. त्याच अनुशंगाने कृषी मंत्रालयाकडून दरवर्षी तेलबियांचे अंदाजित उत्पादन काढले जाते. खरीपातील पेरणी झाली कि, याबाबत अंदाज बांधला जातो. त्यानुसार यंदाही 260 लाख टन उत्पादन होईल असा अंदाज होता. सोयाबीन, मात्र खरीपातील पीकांना पावसामुळे फटका असल्याने सर्व गणित बिघडले आहे.

महाराष्ट्र राज्यात यंदा पेरणीपासून पिकावर संकट होते. सुरुवातीला किडीचा प्रादुर्भाव व अंतिम टप्प्यात पावसाचा जोर वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता याचाच परिणाम तेलबियाणांच्या उत्पादनावरही दिसत आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.