Take a fresh look at your lifestyle.

हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख आहे तरी कोण?

0

शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज महत्वाचा असला तरी अनेकदा हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज जुळत नाही. मात्र, सध्या हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख यांची सर्वत्र डंका आहे.

पाऊस कधी व किती पडणार? याचा डख यांनी वर्तविलेला अंदाज अचूक ठरतोय. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो आहे. त्यामुळेच एकवेळ हवामान विभाग चुकेलं पण पंजाबराव डख नाहीत अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालीय.

मात्र पंजाबराव डख आहेत तरी कोण? त्यांची पार्शवभूमी काय? त्यांचे अंदाज एवढे अचूक का ठरतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत..

● डख हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील आहे.
● ते शेतकरी कुटुंबातील आहेत.
● ते पेशाने अंशकालीन शिक्षक आहेत.
● जिज्ञासू स्वभावाचे डख लहानपणापासून टिव्हीवरील इंग्रजी व हिंदी बातम्या ते वडिलांबरोबर कायम पाहत.
● मग ते हवामानाच्या अंदाजावर आपल्या वडिलांसोबत सातत्याने चर्चा करत.
● हवामान विषयात आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी तांत्रिक गोष्टी जाणून घेण्यास सुरुवात केली.
● सी-डॅक (C-DAC) हा संगणक संबंधित अभ्यास पूर्ण केला.
● या अभ्यासक्रमात त्यांना उपग्रह, अवकाश याविषयीचे बारकावे समजावून घेण्यास मोलाची मदत झाली. त्यानुसार अंदाज व्यक्त करण्याची आवड लागली.
● सध्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी ते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रबोधन करत असतात.
● हवामान विभागाच्या अंदाजासोबत शेतकरी डख यांनी वर्तविलेल्या अंदाजाची पडताळणी देखील करतात.

असे आहे ‘डख’ मॉडेल : डख आपला वार्षिक अंदाज देखील जाहीर करतात. शेतकऱ्यांना वार्षिक पीक नियोजन सोयीचे ठरावे? या उद्देशाने शेतकऱ्यांपर्यंत हवामाच्या अंदाजाची माहिती पोहचवत असतात. डख यांनी हवामान अंदाज वर्तविण्याचे मॉड्यूल विकसित केले असून तंत्रज्ञानासोबतच विविध नैसर्गिक घटकांचा देखील त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलाय.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues