Take a fresh look at your lifestyle.

बापरे! एका द्राक्षाची किंमत ३० हजार रुपये…

0

आज आपण एका फळाबद्दल पाहूयात जे जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक आहे. हा एक द्राक्षांचा प्रकार असून या द्राक्षांचा एक घड ३० ते २५ हजारांना विकला जातो. हे महाग फळं बाजारात विकलं जात नाही. तर हे विकताना लिलाव केला जातो.

या द्राक्षांना रुबी रोमन नावाने ओळखले जाते. खासकरून जापानमध्ये या द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. यांचा आकार फारच मोठा असतो. ही द्राक्षं चवीला अतिशय गोड असतात. जपानमध्ये इशिकावा प्री फ्रेक्चरल या एकमेव कंपनीकडून या द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. यांचं उत्पादन मर्यादित असल्याने त्यांना एवढा भाव आहे.

२०२० साली झालेल्या एका लिलावामध्ये या द्राक्षांच्या एका घडासाठी जवळजवळ ८.८ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. अनेकदा या घडांमधील द्राक्षांची संख्या निश्चित असते. आता सर्व हिशोब लावल्यास काही घडांना मिळणाऱ्या दरानुसार एका द्राक्षाची किंमत ही ३० हजार रुपयांपर्यंत जाते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues