Take a fresh look at your lifestyle.

Hockey world cup 2023 : आजपासून रंगणार पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा; भारताचा सामना कधी? जाणून घ्या सविस्तर

0

आजपासून पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा (Hockey world cup) 2023 चे बिगुल वाजणार आहे. हॉकी विश्वचषक स्पर्धेला भारतातील ओडिशा येथे आजपासून सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यकमाई करणारा भारतीय पुरुष संघ आता विश्वचषक हॉकी स्पर्धेतील 48 वर्षांपासूनचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला असून या स्पर्धेचा पहिल्या दिवशी भारतापुढे सलामीला तुल्यबळ स्पेनचे आव्हान असेल.

या स्पर्धेचा अंतिम सामना हा 29 जानेवारीला होणार असून या स्पर्धात 16 संघानी सहभाग नोंदवला असून या विश्वचषकासाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदाचा विश्वचषक कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. या विश्वचषक स्पर्धात भारताचे सामने कधी होणार ते जाणून घेऊया.. (hockey world cup 2023 india match schedule)

भारतीय संघाचे सामने कधी होणार

  • भारत विरुद्ध स्पेन – 13 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
  • भारत विरुद्ध इंग्लंड – 15 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता
  • भारत विरुद्ध वेल्स – 19 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

  • गोलरक्षक – कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश
  • बचावपटू – जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप
  • मिडफिल्डर – मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग
  • फॉरवर्ड्स – मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग
  • पर्यायी खेळाडू – राजकुमार पाल, जुगराज सिंग

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ सुवर्णपदके पटकावणारा भारतीय संघ गेल्या जवळपास पाच दशकांपासून विश्वचषकात मात्र पदकापासून वंचित आहे. 1971च्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर 1973च्या पुढील पर्वात भारताने रौप्यपदक जिंकले. त्यानंतर 1975च्या विश्वचषकात भारताने एक पाऊल पुढे जात जेतेपदावर मोहोर उमटवली होती. परंतु, 1978 ते 2018 या कालावधीत भारताला विश्वचषकात साखळी फेरीचा टप्पाही ओलांडता आला नाही. यंदा मात्र भारताकडून अधिक दर्जेदार कामगिरीची अपेक्षा केली जाते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues