Take a fresh look at your lifestyle.

Ved Movie : रितेशच्या ‘वेड’ चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’!! दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

0

रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ (ved movie) हा मराठी सिनेमा मागील दोन तीन दिवसांपूर्वी म्हणजे येत 30 डिसेंबर प्रदर्शित झाला. 20 वर्षांच्या अभिनयातील कारकिर्दीनंतर रितेश ‘वेड’ या सिनेमातून दिग्दर्शकीय पदार्पण करतोय. या सिनेमात तो दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

तर दुसरीकडे या चित्रपटात रितेश ची पत्नी जिनिलिया हि या सिनेमाची निर्माती म्हणून काम करत आहे. शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा असणार आहे. रितेश व जिनिलियाच्या हा चित्रपट 30 डिसेंबर प्रदर्शित झाला असून या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. होय, प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत साधारण महाराष्टातून 8 कोटी च्या आसपास कमाई केली आहे.

दरम्यान, या चित्रपटात रितेश व जिनिलिया व्यतिरिक्त अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर इत्यादी कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. अशोक सराफ रितेशच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत तर विद्याधर जोशी जिनिलियाच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाला लाभलेल्या अजय अतुल यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues