Take a fresh look at your lifestyle.

Police bharti : भविष्याचा प्रश्न आहे मित्रांनो!! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांनो मैदानी परीक्षेला उरला फक्त 1 दिवस; हे कागदपत्र ठेवा रेडी

0

राज्यात काही दिवसांपूर्वीच अनेक वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती (maharashtra police bharti 2022-2023) बाबत मोठी जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव सुरु केला. या 18000 भरतीसाठी सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच साधारण एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केलं आहेत असे म्हणल्याला काही हरकत नाही.

पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या 02 जानेवारी 2023 पासून म्हणजे उद्यापासून सुरु होणार आहेत. पण त्या आधी या चाचणीसाठीचं हॉल तिकीट नक्की कसं डाउनलोड करावं तसंच कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे जाणून घेऊया.

अशी असेल पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी :

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत.

मैदानी परीक्षेला जाण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक

सुरवातीला चालक पदांची मैदानी चाचणी होणार आहे. त्यावेळी उमेदवारांकडे पुढील डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहेत.

▪️ शैक्षणिक कागदपत्रं
▪️ आरक्षण, क्रिडा प्रमाणपत्र
▪️ चारित्र्य पडताळणी अहवाल
▪️ आधारकार्ड
▪️ पॅनकार्ड
▪️ एलएमव्ही लायसन
▪️ अर्जाची छायांकित प्रत (Xerox)
▪️ कॉल लेटर

अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट-

▪️ सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
▪️ “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
▪️ प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
▪️ लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
▪️ ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
▪️ प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
▪️ तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.l

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues