Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बंगलोरच्या भक्ताकडून साई चरणी 46 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण

0

नववर्षानिमित्त बेंगलोर येथील दानशुर साईभक्त राजा दत्ता व सौ.शिवानी दत्ता यांनी 928 ग्रॅम वजनाचा 46 लाख 70 हजार 624 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिला आहे.

दत्ता दाम्पत्यांनी हा सुवर्ण मुकुट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपुर्त केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षीच म्हणजे 2022 मध्ये साईचरणी तब्बल 400 कोटींचे दान जमा झाले होते.

राज्यात कोरोनानंतर शिर्डी येथील साईंच्या दरबारात भक्तांची गर्दी वाढली असून दानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.

नव वर्ष साईच्या सानिध्यात साजरे करण्यासाठी साईभक्त उत्सुक असतात. त्यामुळे दरवर्षी साईदबारी साईभक्तांची मांदीयाळी असते. त्यात अनेक साईभक्तांकडून साईंच्या तिजोरीत भरभरून दान टाकले जाते.

Ved Movie : रितेशच्या ‘वेड’ चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’!! दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews