Take a fresh look at your lifestyle.

Loan for Business : 2.5 लाख रुपये कर्ज loan घ्या आणि करा सुरु शेळीपालन ( Shelipalan ) व्यवसाय, नाबार्ड तर्फे मिळतो अनुदानाचा लाभ Nabard

0

LOAN FOR AGRICULTURAL BUSINESS : भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर ( Agriculture ) अवलंबून आहे. एवढेच नाही तर भारताची अर्थव्यवस्था देखील कृषी क्षेत्रावर आधारित आहे. भारतामध्ये शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुकुट पालन, Poultry शेळीपालन Goat Farming तसेच पशुपालन Dairy Business व्यवसाय करतात

केंद्र आणि राज्य सरकार Indian Government यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला तसेच शेतीशी निगडित जोड धंद्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या योजना Government Schemes जाहीर केल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदानाचा लाभ दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ( Agriculture loan ) मिळवून त्यांना त्यांची आर्थिक प्रगती चांगली करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करायचा असतो परंतु भांडवल नसल्याकारणाने शेतकरी ते करू शकत नाही. अगदी शेळीपालनाचा विचार करायचा झाला तरीसुद्धा भांडवलाची समस्या येते. या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला शेळी पालन करायचे असेल तर नाबार्ड द्वारे कर्ज LOAN उपलब्ध करून दिले जाते. याचा फायदा अनेक शेतकरी घेऊ शकतात अथवा घेत आहेत. या लेखात आपण शेळीपालनासाठी नाबार्डचे कर्ज NABARD LOAN कसे मिळवायचे? व त्यासाठी असणारी पात्रता व नियम यांची माहिती करून घेणार आहोत.

शेळीपालनासाठी नाबार्डचे ( NABARD ) अर्थसहाय्य :

NABARD LOAN FOR AGRICULTURE नाबार्ड कृषी क्षेत्रासाठी तसेच विविध प्रकारच्या जोड धंद्यासाठी आकर्षक परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते. याचप्रकारे शेळीपालनासाठी देखील अतिशय आकर्षक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये नाबार्ड आघाडीवर आहे. शेळीपालनासाठी कर्ज पुरवठा करताना नाबार्ड विविध प्रकारच्या वित्तीय संस्थांच्या सहकार्याने कर्ज उपलब्ध करून देते. यामध्ये व्यावसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राज्य सहकारी बँक आणि नागरी बँक या वित्तीय संस्थांचा समावेश आहे.

शेळीपालनासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यासाठी कोण पात्र आहे? : eligibility for loan
शेळी पालनासाठी कर्ज मिळवण्यासाठी कर्जदाराला शेळी खरेदीवर खर्च केलेल्या रकमेपैकी 25 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान मिळण्याचा अधिकार आहे. तसेच एस सी आणि एसटी कॅटेगरीतील लोकांना आणि बीपीएल श्रेणीतील लोकांना 33 टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते. जर लाभार्थी ओबीसी कॅटेगरीत असेल तर 25 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते. या माध्यमातून शेळीपालनासाठी जास्तीत जास्त 2 लाख 50 हजार रुपये कर्ज मिळते.

या माध्यमातून कर्ज देण्यासाठी अर्ज करण्याचे फायदे :
या माध्यमातून कर्ज मिळवण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जोड धंदा उभा करण्यासाठी एक भांडवल देखील मिळते व शेती देखील या पद्धतीने करता येते. कुठलाही व्यवसाय करताना भांडवलाचा अभाव हे जी समस्या असते ती यामध्ये राहत नाही. शेती मध्ये प्राणी भांडवल म्हणून काम करत असल्याने आर्थिक पाठबळ मिळवून हे भांडवल उभारण्यात गुंतवणे शहाणपणाचे आहे. जनावरांच्या माध्यमातून मिळणारे उत्पादन दीर्घकाळासाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेशी असते.

शेळी पालनासाठी sheli palan कर्ज द्यायचे असेल तर हि कागदपत्रे लागतात : Loan for goat farming

1- 4 पासपोर्ट आकाराचे फोटो

2- पत्त्याचा पुरावा साठी रेशन कार्ड, मतदान कार्ड, वीजबिल इत्यादी

3- ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पैकी एक कागदपत्र आवश्यक असते.

4- विशिष्ट कॅटेगरीत असाल तर जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

शेळी पालनासाठी कर्ज मिळण्याची प्रक्रिया : process for Loan

1- कोणत्याही स्थानिक कृषी बँक किंवा प्रादेशिक बँकेमध्ये जावे आणि नाबार्डच्या माध्यमातून शेळी पालनासाठी अर्ज करावा.
2- नाबार्डकडून सबसिडी मिळवण्यासाठी तुमच्या व्यवसायाची योजना कशी आहे हे सादर करणे आवश्यक आहे. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सर्व शेळी पालन संबंधित तपशील समाविष्ट असावीत.
3- नाबार्डकडून मान्यता मिळवण्यासाठी व्यवसाय योजनेसह अर्ज सबमिट करावा.
4- कर्ज आणि अनुदान मंजूर करण्यापूर्वी तांत्रिक अधिकारी शेतीला भेट देतात आणि चौकशी करतात.
5- कर्जाची रक्कम अप्रोवल झाल्यानंतर ही रक्कम थेट कर्जदाराच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. यामध्ये अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे की कर्जाची रक्कम प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त केवळ 85 टक्के आहे. अर्जदाराला 15% चा खर्च सहन करावा लागतो.

स्रोत : Krishi Jagaran

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues